Vivo नं टेक मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘वाय’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Vivo Y35 नावानं लाँच झाला आहे. विवो वाय35 4जी फोन आहे जो 50MP Camera, 8GB RAM, Snapdragon 680 SOC आणि 44W 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. पुढे या नवीन विवो मोबाइलच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.
Vivo Y35 4G
विवो वाय35 4जी फोन 20:9 अस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेमध्ये 550निट्स ब्राइटनेस तसेच एनटीएससी कलर गमुट सारखे फीचर्स देखील आहेत. या फोनचे डायमेंशन 164.376.1×8.28एमएम आणि वजन 188 ग्राम आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा, 8GB RAM सह येतोय Vivo V25 Pro 5G; 17 ऑगस्टला होणार भारतात लाँच जाणून घ्या किंमत
Vivo Y35 4G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल 8 जीबी रॅमवर सादर करण्यात आला आहे जो एक्स्ट्रा 8जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो. म्हणजे एकूण 16 जीबी रॅमची पावर या फोनमध्ये मिलती आहे. इंटरनल स्टोरेज 128 जीबी आहे जी 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी विवो वाय35 4जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: VIVO नं कायमस्वरूपी कमी केली दोन स्मार्टफोन्सची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत
Vivo Y35 4G ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये हा फोन Agate Black आणि Dawn Gold कलरमध्ये लाँच झाला आहे ज्याची प्राइस IDR 3399000 म्हणजे 18,500 रुपयांच्या आसपास आहे. भारतात विवो वाय35 4जी कधी लाँच होईल, हे अजून स्पष्ट झालं नाही.
