VIVO नं कायमस्वरूपी कमी केली दोन स्मार्टफोन्सची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत

Vivo नं आपल्या भारतीय चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाची भेट देत दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. भारतीय बाजारात Vivo V23e 5G आणि Vivo Y21T च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. विवोनं या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती थेट 1,000 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्याचबरोबर कंपनीनं विवो वी23ई 5जी फोन तसेच विवो वाय21टी वर 2,500 रुपयांच्या कॅशबॅकची घोषणा केली आहे.

विवो मोबाइल झाले स्वस्त

विवो इंडियानं Vivo V23e 5G आणि Vivo Y21T च्या किंमतीत कपात केली आहे. या दोन्ही मोबाइल फोन्स आता 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. वी23ई 5जी फोन अजूनपर्यंत 25,999 रुपयांमध्ये मिळत होता परंतु आता यासाठी फक्त 24,999 रुपये द्यावे लागतील. तसेच 16,499 रुपयांचा विवो वाय21टी आता 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Vivo V23e 5G चे स्पेसिफिकेशन्स

विवो वी23ई 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीनं सुसज्ज आहे. हा अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट दिला आहे. हा 5जी फोन एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. त्यामुळे 8 जीबी रॅममध्ये 4जीबी रॅमची अतिरिक्त ताकद मिळवता येते.

हा मोबाइल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच फ्रंट पॅनलवर 44 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 4,050एमएएचची बॅटरी मिळते जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Vivo Y21T चे स्पेसिफिकेशन्स

विवो वाय21टी मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, याचे रिजोल्यूशन 1,600 X 720 पिक्सल आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच मिळते, ज्यात 8MP चा सेन्सर आहे. हँडसेटच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यात 50MP (f/1.8 अपर्चर) प्रायमरी सेन्सर, 2MP (f/2.4 अपर्चर) सेकंडरी लेन्स आणि 2MP (f/2.4 अपर्चर) तिसरा सेन्सर आहे.

हा अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 कस्टम स्किनवर चालतो. फोनचे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 6 जीबी रॅमसह 2 जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here