Home Featured नादच खुळा! 11 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरी Tecno Spark 8P लाँच

नादच खुळा! 11 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरी Tecno Spark 8P लाँच

टेक कंपनी टेक्नो भारतात नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करणार असल्याचीच माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत कंपनीनं एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा मोबाईल फोन Tecno Spark 8P नावानं भारतीयांच्या भेटीला आला हे. टेक्नो स्पार्क 8पी 50MP Camera असलेल्या भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे. या मोबाईल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट तसेच 7जीबी रॅमची ताकद देण्यात आली आहे. विशेष म्हणजे Tecno Spark 8P ची किंमत मात्र 11 हजारांच्या आत ठेवण्यात आली आहे.

Tecno Spark 8P चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 8P स्मार्टफोनमध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.6 इंचाचा हा FHD+ डिस्प्ले 401PPI पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. या टेक्नो मोबाईलचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.1 टक्के आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित HiOS 7.6 वर चालतो ज्यात प्रोसेसिंगसाठी ARM Cortex-A75 ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच Mediatek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन Arm Mali-G52 GPU ला सपोर्ट करतो जो 1GHz Graphics core वर चालतो. हे देखील वाचा: चिनी कंपन्यांना म्हणाल बाय-बाय! 8699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला LAVA Blaze लाँच, Earbuds Free

Tecno Spark 8P स्मार्टफोन 4GB RAM सह लाँच झाला आहे, सोबतीला 3जीबी वचुर्अल रॅम देण्यात आल्यामुळे एकूण 7GB RAM ची परफॉर्मन्स फोनमधून मिळते. या फोनमध्ये 64GB Storage देण्यात आली आहे जी 512GB पर्यंत वाढवता येते. हा फोन IPX2 स्प्लॅश रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. Tecno Spark 8P मध्ये 5000mAh Battery देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये हा फोन 25 दिवस स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलच्या अन्य दोन लेन्सला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो तसेच एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. विशेष म्हणजे कंपनीनं फ्रंटला देखील ड्युअल फ्लॅशलाईट दिली आहे. हे देखील वाचा: Oppo चा बजेट फ्रेंडली 5G Phone आणखी स्वस्तात; Oppo K10 5G आणि Oppo K10 4G वर मोठा डिस्काउंट

Tecno Spark 8P ची किंमत

टेक्नो स्पार्क 8पी स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतात लाँच करण्यात आला आहे. या एकमेव व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या मोबाईल फोनची किंमत कंपनीनं 10,999 रुपये ठेवली आहे.Tecno Spark 8P स्मार्टफोन आजपासून Turquoise Cyan, Iris Purple, Tahiti Gold आणि Atlantic Blue या रंगात विकत घेता येईल.