चिनी कंपन्यांना म्हणाल बाय-बाय! 8699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला LAVA Blaze लाँच, Earbuds Free

Cheap Smartphones बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली भारतीय स्मार्टफोन कंपनी LAVA नं आज आपल्या पोर्टफोलियोमध्ये नव्या हँडसेटची भर टाकली आहे. फिचर फोन सेगमेंटमध्ये जास्त सक्रिय झालेल्या लावा कंपनीनं भारतात नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा नवीन मोबाईल LAVA Blaze नावानं भारतीयांच्या भेटीला आला आहे. लावा ब्लेज स्मार्टफोन 13MP Rear Camera, 5000mAh battery, Android 12, MediaTek Helio A22 चिपसेट आणि 6GB RAM सह सादर करण्यात आला आहे. इतके दमदार फीचर्स असूनही कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत फक्त 8,699 रुपये ठेवली आहे. लो बजेट सेग्मेंटमध्ये Realme आणि Redmi सारख्या चिनी ब्रँड्सना हा हँडसेट नक्कीच टक्कर देईल.

LAVA Blaze ची किंमत आणि ऑफर

लावा ब्लेज स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल 8,699 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन आजपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा फोन बुक करणाऱ्या पहिल्या 1,000 ग्राहकांना कंपनी 1,599 रुपयांचे Lava Probuds 21 tws मोफत देणार आहे. LAVA Blaze ची विक्री 14 जुलैपासून सुरु होईल. हा लावा मोबाईल Red, Black, Green आणि Blue कलरमध्ये फ्लिपकार्ट तसेच रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: Oppo चा बजेट फ्रेंडली 5G Phone आणखी स्वस्तात; Oppo K10 5G आणि Oppo K10 4G वर मोठा डिस्काउंट

LAVA Blaze चे स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज स्मार्टफोनमध्ये फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. तसेच बॅक पॅनल ग्लास बॉडीपासून बनलेला आहे. हा स्मार्टफोन 20:9 अस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ ड्यूड्रॉप डिस्प्लेवर लाँच झाला आहे जो एक आयपीएस एलसीडी पॅनल आहे. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच मोठी बॅटरी मिळते, जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

फोटोग्राफीसाठी हा लावा मोबाईल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी देखील मदत घेतो. तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलचा अतिरिक्त सेन्सर्स देखील देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी LAVA Blaze मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Hero Splendor सारखी दिसते ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईक, फुल चार्जमध्ये 140 Km ची रेंज

LAVA Blaze स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे. स्मार्टफोन 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए 22 चिपसेटवर चालतो. कंपनीनं आपला हा मोबाईल फोन 3 जीबी रॅमसह लाँच केला आहे, परंतु सोबतीला एक्स्ट्रा 3 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील मिळतो. म्हणजे लावा ब्लेज स्मार्टफोन 6जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here