ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सध्या Electronics Days सेल सुरु आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टवर अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंटसह विकले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. जर तुमचं बजेट 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही Moto G51 स्मार्टफोनची निवड करू शकता. 5G कनेक्टिव्हिटीसह येणारा हा स्मार्टफोन बँक डिस्काउंटसह EMI आणि एक्सचेंज डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर विकला जात आहे. पुढे आम्ही Moto G51 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डीलची माहिती दिली आहे.
Moto G51 5G ऑफर
Moto G51 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 12,999 रुपयांमध्ये विकला जात आहे परंतु जर तुम्ही सिटी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डनं पेमेंट केलं तर 1000 रुपयांची सूट मिळेल. EMI ट्रँजॅक्शनवर देखील 1250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. बँक ऑफ बडौदाच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1500 रुपयांची सूट मिळेल. त्याचबरोबर मोटोरोलाचा हा फोन मासिक हप्त्यांवर देखील विकत घेता येईल. फ्लिपकार्टवरून मोटोरोलाचा हा फोन 451 रुपये प्रतिमाहच्या हप्त्यावर विकत घेता येईल. हे देखील वाचा: वजनाने हलका, फीचर्सनी शक्तिशाली! पूर्ण झाली Xiaomi 12 Lite च्या लाँचची तयारी
फ्लिपकार्टवरून Moto G51 5G स्मार्टफोन विकत घेतल्यास अजूनही काही बेनिफिट्स दिले जात आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर तीन महिन्यांचं Gana Plus सब्सक्रिप्शन, BYJU चे तीन लाईव्ह क्लास, 201 रुपयांचं बिटकॉइन, 6,999 रुपयांच्या Google Nest hub फक्त 4,999 रुपयांमध्ये आणि 3499 रुपयांच्या Google Nest mini फक्त 1999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा LCD पॅनल 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC सह बाजारात आला आहे. सोबतीला Adreno 619 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हे देखील वाचा: Airtel देतंय 109 रुपयांमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी, Jio कडे आहे का असा जबरदस्त प्लॅन?
Moto G51 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो आणि 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्टसह गुगल असिस्टंट बटन देण्यात आलं आहे. त्याचरोबर फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यातील IP52 वॉटर रिपेलंट डिजाईन पाण्यापासून फोनचं संरक्षण करते.
