Airtel देतंय 109 रुपयांमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी, Jio कडे आहे का असा जबरदस्त प्लॅन?

Airtel नं काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना सरप्राईज देत 4 नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यातील दोन प्लॅनमध्ये मंथली वॅलिडिटीसह येतात. यातील 109 रुपयांच्या प्लॅनयामध्ये 30 दिवसांची तर 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये महिनाभराची वैधता मिळते. कमी किंमतीत येणाऱ्या या प्लॅनचं कौतुक ग्राहकांनी केलं आहे. तसेच Jio सोबत याची तुलना देखील केली जात आहेत. आम्ही देखील पुढे दोन्ही दिग्गज टेलिकॉम कंपन्यांच्या स्वस्त प्लॅन्सची तुलना केली आहे.

Airtel चा 109 आणि 111 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 109 आणि 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये वैधता वेगळी आहे बाकी फायदे सारखेच आहेत. 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळते. तर 111 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्याच्या वैधता दिली जाते. म्हणजे ज्या दिवशी प्लॅन सुरु होईल पुढील रिचार्ज देखील त्याच तारखेला करावा लागेल. म्हणजे ज्या महिन्यात 31 दिवस असतील त्या महिन्यात 31 दिवसांची वैधता मिळेल. हे देखील वाचा: 4 रुपयांमध्ये कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स; 30 दिवसांच्या वैधतेसह Airtel चे 4 नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन

अन्य बेनिफिट्स पाहता दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो, ज्यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी तुमच्याकडून 2.5 पैसे प्रति सेकंड दराने शुल्क आकारले जाते. तसेच तुम्हाला 200 एमबी डेटा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये लोकल एसएमएससती 1 रुपये प्रति एसएमएस तर एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये शुल्क आकारले जाईल. या दोन्ही प्लॅन्सचा फायदा म्हणजे तुम्ही अत्यंत कमी किंमतीत महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहू शकता. ज्या लोकांना जास्त इनकमिंग कॉल्स येतात त्यांच्यासाठी हे प्लॅन्स जास्त उपयुक्त ठरतील.

Jio Phone रिचार्ज प्लॅन

Jio कडे देखील 100 रुपयांच्या आसपास तीन वेगवेगळे प्लॅन्स आहेत. यात 75 रुपये, 91 रुपये आणि 125 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

75 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 23 दिवसांची वैधता मिळते. कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसह डेली 100 एमबी डेटा सह 200 एमबी अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. तसेच 50 एसएमएस आणि Jio अ‍ॅप सर्व्हिस देखील मिळतात.

91 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला वॅलिडिटी 28 दिवसांची मिळते. त्याचबरोबर 100 एमबी डेली डेटा सह 200 एमबी अतिरिक्त डेटा दिला जातो. यात देखील 50 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते.

125 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 23 दिवसांची वैधता मिळते आणि रोज 500 एमबी डेटा दिला जातो. म्हणजे एकूण 11.5 जीबी डेटा वापरता येतो. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएससह जियो अ‍ॅप वापरता येतात.

एकंदरीत Jio च्या हे प्लॅन कॉलिंगच्या बाबतीत चांगले आहेत. या प्लॅनमध्ये Airtel च्या तुलनेत जास्त कॉलिंग आणि डेटा मिळतो परंतु वैधता खूप कमी आहे आणि तुम्ही हे प्लॅन फक्त Jio Phone सोबतच वापरू शकता.

Jio स्मार्टफोन रिचार्ज प्लॅन

Jio नं स्मार्टफोनसाठी 119, 149 आणि 155 रुपयांचे स्वस्त प्लॅन सादर केले आहेत. 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 14 दिवसांची वैधता मिळते. तसेच यात तुम्हाला रोज 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. 14 दिवसांत एकूण 21 जीबी डेटा वापरता येतो. तसेच 300 एसएमएस आणि जियो सेवा मोफत मिळतात.

149 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 20 दिवसांची वॅलिडिटी मिळते आणि रोज 1 जीबी मिळतो. म्हणजे एकूण 20 जीबी डेटा तुम्हाला मिळत आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, 300 फ्री एसएमएस आणि Jio सर्व्हिसेसचा वापर करता येतो.

तर 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनीनं 28 दिवसांची वैधता दिली आहे परंतु फक्त 2 जीबी डेटा मिळत आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस देखील दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये जियो सर्व्हिसेस मोफत मिळतात.

वरील प्लॅन्स पाहता जियो कॉलिंग तर भरपूर देत आहे परंतु कोणताही प्लॅन Airtel पेक्षा स्वस्त नाही. तसेच वॅलिडिटीच्या बाबतीत देखील कोणताही प्लॅन 30 दिवस किंवा महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहणार नाही. हे देखील वाचा: गोगल गायीच्या स्पिडनं चालू आहे का Jio चं इंटरनेट? ‘ही’ सेटिंग बदलताच मिळेल रॉकेट स्पीड

निष्कर्ष

Airtel च्या नवीन 109 आणि 111 रुपयांच्या प्लॅनची तुलना Jio च्या अनेक प्लॅन सोबत केल्यावर समजते की जर तुम्हाला जास्त कॉलिंग किंवा डेटा नको असेल तर Airtel चे हे प्लॅन बेस्ट आहेत. हे प्लॅन कोणत्याही 2जी, 3जी किंवा 4जी फोनवर वापरता येतील. Jio चे सर्व प्लॅन डेटा बेस्ड आहेत आणि कॉलिंगसाठी देखील चांगले आहेत. कॉलिंग आणि डेटा जरी जास्त असला तरी महिनाभराची वैधता मिळत नाही. तसेच कंपनीचे सर्वात स्वस्त प्लॅन्स फक्त जियो फोन पुरते मर्यादित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here