Home बातम्या 5G सर्व्हिसबद्दल सरकारची मोठी घोषणा, सांगितली लाँच डेट!

5G सर्व्हिसबद्दल सरकारची मोठी घोषणा, सांगितली लाँच डेट!

भारतात येणाऱ्या 5G सर्व्हिसची आतुरतेने वाट पाहत असलेल्या लोकांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. सरकार तसेच टेलीकॉम कंपन्या मोबाइल संचार टेक्नॉलॉजीची 5वी पिढी पूर्णपणे तयार असल्याचं दाखवत आहेत. परंतु अजूनतरी 5G सर्व्हिस रोलआउटची तारीख समोर आली नाही. आता केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की 5जी सर्व्हिस 12 ऑक्टोबर पर्यंतसुरु केली जाईल. तसेच त्यांनी सांगितलं की त्यानंतर या सेवेचे देशभरातील शहर आणि गावांमध्ये विस्तार केला जाईल, असं देखील ते म्हणाले.

12 ऑक्टोबरला लाँच होईल 5G

मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 5जी सेवा वेगानं सूर करण्याची योजना बनवत आहोत. दूरसंचार ऑपरेटर या संदर्भात काम करत आहेत आणि इंस्टॉलेशन करत आहेत. आशा आहे की 12 ऑक्टोबर पर्यंत 5जी सर्व्हिस सुरु होईल आणि त्यांनतर शहरांत आणि ग्रामीण भागात तिचा विस्तार होईल. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितलं की, पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशातील कानाकोपऱ्यात 5G पोहोचेल अशी त्यांना आशा आहे. हे देखील वाचा: भारतात बनणारे स्मार्टफोन महागणार! सरकारच्या निर्णयामुळे Made in India मोबाइल्सना फटका

5G ची किंमत असेल कमी

अश्विनी वैष्णव यांनी 5G लाँच डेटची घोषणा करताना सांगितलं की ही सर्व्हिस स्वस्त असेल याची काळजी घेत आहोत तसेच शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष्य केंद्रित करत आहोत. विशेष 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर बातम्या येत होत्या की भारतात 5G सेवा 15 August 2022 लाँच केली जाऊ शकते, जे झालं नाही. काही दिवसांपूर्वी 29 सप्टेंबर, 2022 ला 5G लाँच केलं जाईल, असं बातम्यांमधून समोर आलं होतं. 29 सप्टेंबरला इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2022 चं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यानिमित्ताने भारतात 5G सेवा देखील सुरु होईल, असं सांगण्यात आलं होतं.

या 13 शहरांमध्ये मिळेल सर्वप्रथम 5G सर्व्हिस

यंदा डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशंस (DoT) नं माहिती दिली होती की भारतात 5G रोलआउट नंतर 13 शहरांमध्ये सर्वात आधी 5G सर्व्हिस मिळेल. 2022 मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंडीगढ़, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. हे देखील वाचा: Mukesh Ambani 29 ऑगस्टला करत आहेत मोठा इव्हेंट, Jio 5G SIM आणि 5G Plans ची होणार घोषणा

कोणती टेलिकॉम कंपनीनं भारतात सर्वात आधी व्यावसायिक 5G सर्व्हिस सुरु करेल याची अधिकृत माहिती मात्र डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशननं दिली नाही. देशातील तीन प्रमुख टेलीकॉम कंपन्या रिलायन्स जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडियानं या शहरांमध्ये आपली टेस्टिंग केली आहे.