Reliance Industries (RIL) च्या 45th Annual General Meeting (AGM) च्या तारखेचा खुलासा झाला आहे. कंपनीनं माहिती दिली आहे की पुढील आठवड्यात 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 2 वाजता AGM सुरु होईल. या बैठकीत Mukesh Ambani आणि Akash Ambani अनेक मोठ्या घोषणा करतील, अशी चर्चा आहे. कंपनीनं याबाबत कोणतीही माहिती अजूनतरी दिली नाही. परंतु लीक्स रिपोर्ट्सनुसार, सभेत रिलायन्स जियोच्या आयपीओसह रिलायन्स रिटेलच्या आयपीओची घोषणा केली जाऊ शकते. तसेच या एजीएम मध्ये 5जी मोबाइल सर्व्हिस लाँच करण्याच्या तारखेची देखील घोषणा केली जाऊ शकते.
AGM 2022 मध्ये होणार मोठी घोषणा
2019 च्या एजीएम मध्ये कंपनीचे चेयरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुढील पाच वर्षांत रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेलची स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करण्याची घोषणे केली होती. तासेक्स 5G बद्दल देखील कंपनीनं माहिती दिली होती की जियोची 5G सर्व्हिस मेड इन इंडिया असेल. Reliance Industries (RIL) ची एजीएम कंपनीच्या ऑफिशियल युट्युब चॅनेलवरून थेट प्रक्षेपित केली जाईल.
RIL AGM 2022 मध्ये होणाऱ्या मोठ्या घोषणा
- Reliance Jio IPO
- Reliance Jio 5G
- Reliance Jio 5G Phone
- Reliance Jio 5G SIM and Plan
रिलायन्स जियो आयपीओ
आतापर्यंत आलेल्या लीक रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये रिलायन्स जियो, रिलायन्स डिजिटल आणि ऑयल टू केमिकल यूनिटच्या आयपीओच्या टाइमलाइनची घोषणा केली जाऊ शकते. ब्रोकरेज फर्म CLSA नूर रिलायन्स जियोचा आयपीओ यंदा लाँच केला जाऊ शकतो.
जियो 5G फोन
5G सर्व्हिसची चर्चा सुरु असताना Jio 5G Phone एक सरप्राईज ठरू शकतो. अलीकडेच एक बातमी लीक झाली आहे की कंपनी जियो फोन 4G च्या धर्तीवर स्वस्त 5G फोन लाँच करू शकते जो Jio Phone 5G नावानं बाजारात येईल. या फोनची बुकिंग 2000 रुपयांपासून सुरु होऊ शकते आणि हा सुलभ हप्त्यावर विकत घेता येईल. लीक बातमी खरी असल्यास पुढील आठवड्यात Jio 5G Phone लाँच केला जाऊ शकतो.
5जी सर्व्हिस होणार लाँच
मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएम मध्ये 5जी सेवेच्या लाँचची घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे. 5जी स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपये खर्च केले आहेत.
Jio 5G SIM आणि Plan
जेव्हा Jio 5G सर्व्हिस लाँच केली जाईल तेव्हा कंपनी 5G सिम देखील सादर करेल, अशी चर्चा आहे. परंतु काही रिपोर्ट्सनुसार जर तुमच्याकडे Jio 4G सिम असेल तर तुम्ही कोणत्याही सिम अपग्रेडविना Jio 5G सेवा वापरू शकाल. तसेच कंपनीचे 5G प्लॅन अन्य टेलीकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असू शकतात.

















