6,000mAh Battery आणि 24GB RAM च्या ताकदीसह Vivo ने सादर केला हा नवीन 5G Phone

विवोने आज आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘वाय’ सीरिजचा विस्तार करत एक सोबत तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीकडून Vivo Y200, Y200t आणि Y200 GT सादर केले आहेत. हे तिन्ही मोबाइल फोन सध्या चीनमध्ये विकले जाणार आहेत. तसेच Snapdragon 6 Gen 1 चिपसेट, 6000mAh Battery आणि 24GB RAM (12GB+12GB) ची ताकद असणाऱ्या विवो वाय 200 5 जी फोनची संपूर्ण माहिती पुढे पाहू शकता.

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन (चीन)

  • 6.78 इंचाचा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1
  • 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
  • 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा
  • 80 वॉट फास्ट चार्जिंग
  • 6,000 एमएएच बॅटरी

स्क्रीन : नवीन Vivo Y200 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही पंच-होल स्टाईल असणारी Curved AMOLED स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेट तसेच 1300nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर : विवो वाय 200 स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो OriginOS 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Snapdragon 6 Gen 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : चीनमध्ये हा नवीन विवो स्मार्टफोन 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच झाला आहे. फोनमध्ये Memory fusion टेक्नॉलॉजी आहे, फिजिकल रॅममध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम जोडून याला 24GB RAM ची ताकद प्रदान करतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 50-megapixel मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 2-megapixel blur लेन्स सह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo Y200 एफ/2.0 अपर्चर असलेला 8-megapixel front कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा विवो स्मार्टफोन 6000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने सांगितले आहे की फुल चार्ज केल्यानंतर हा नॉर्मल वापरामध्ये 2 दिवसाचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी ब्रँडच्या दाव्यानुसार 24 मिनिटामध्ये 0 ते 50% पर्यंत चार्ज होऊ शकते.

इतर फिचर्स : Vivo Y200 इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. याला वॉटरप्रूफ बनविले आहे तसेच कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.1 आणि OTG ला सपोर्ट मिळतो.

Vivo Y200 किंमत (चीन)

  • 8GB RAM + 128GB Storage : 1599 yuan (जवळपास ₹18,400)
  • 8GB RAM + 256GB Storage : 1799 yuan (जवळपास ₹20,700)
  • 12GB RAM + 256GB Storage : 1999 yuan (जवळपास ₹23,000)
  • 12GB RAM + 512GB Storage : 2299 yuan (जवळपास ₹26,400)

विवो वाय 200 ची किंमत चीनमध्ये 1599 युआनपासून सुरु होत आहे जी 18,400 रुपयांच्या आसपास आहे. यात 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच मोबाईलचे सर्वात मोठे मॉडेल 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज करते ज्याची किंमत भारतीय चलनानुसार 26,400 रुपयांच्या आसपास आहे.

Vivo Y200 5G भारतीय मॉडेल

तसेच वाय 200 नाव असलेला विवो फोन भारतीय बाजारात पहिलाच लाँच झाला आहे परंतु हा आज चीनमध्ये सादर केलेल्या मोबाईलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. भारतीय मॉडेल Qualcomm Snapdragon 4 Gen 1 वर चालतो. यात 44W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी मिळते. तसेच फोटोग्राफीसाठी 64MP Rear तथा 16MP Selfie Camera देण्यात आला आहे. Vivo Y200 5G फोन भारतात ₹21,999 मध्ये विकला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here