Tecno Pova Neo 5G Launch Date: Tecno नं अलीकडेच भारतीय बाजारात India’s first multi-colour changing smartphone TECNO CAMON 19 Pro Mondrian सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून कंपनीनं कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी बजेटमध्ये सादर केली आहे. आता लवकरच कंपनी 5G Service लाँच होण्याआधी आपला मोठा बॅटरी असलेला फोन लाँच करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या आगामी फोन Tecno Pova Neo 5G च्या लाँच डेटची माहिती दिली आहे. हा फोन 6,000mAh बॅटरी सोबतच MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येईल. चला जाणून घेऊया या फोनबाबत सर्व माहिती.
23 सप्टेंबरला लाँच होईल 5G फोन
यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये टेक्नो पोवा नियो फोनचा 4जी व्हेरिएंट कंपनीनं भारतात लाँच केला होता, तर आता या स्मार्टफोनचा 5G व्हर्जन बाजारात येत आहे. Tecno India नं ट्विटरच्या माध्यमातून अनाउंस केलं आहे की Tecno Pova Neo 5G स्मार्टफोन भारतात 23 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी लाँच केला जाईल. काही दिवसांपूर्वी कंपनीनं माहिती दिली होती की टेक्नो पोवा नियो 5जी फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह बाजारात येईल. लाँच डेटसह टेक्नो पोवा नियो 5जी फोनमधील 6000mAh बॅटरी 18W फास्ट चार्जिंगचा खुलासा देखील झाला आहे.
Get ready to say goodbye to battery anxiety with the TECNO POVA NEO 5G, a smartphone with 6000mAh mega battery & 18W flash charger. .
Choose the best of its kind & unleash the powerful battery!
Launching on 23rd of September.
#TECNO #TecnoMobile #TECNOPOVANEO5G #POVANEO5G pic.twitter.com/2pLAtl5iUd— TECNO Mobile India (@TecnoMobileInd) September 21, 2022
Tecno Pova Neo 5G ची डिजाईन
लिक्सनुसार हा स्मार्टफोन दोन रंगात सादर केला जाईल. स्मार्टफोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या उजवीकडे व्हॅल्यूम रॉकर आणि पावर बटन मिळेल. फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह फ्रंट डिस्प्ले मिळू शकतो, ज्यात स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा फिट केला जाईल. हे देखील वाचा: फक्त 618 रुपयांमध्ये घरी घेऊन या Nokia चा हा 4G Mobile; संपता संपणार नाही याची बॅटरी
Tecno Pova Neo 5G लीक स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार, या 5जी फोनमध्ये 6.9-inch AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 6nm प्रोसेसरवर बनलेला MediaTek Dimensity 810 चिपसेट देण्यात येईल. सोबतीला 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळेल. टेक्नोचा आगामी 5G स्मार्टफोन Android 12-आधारित HiOS UI वर चालेल.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात एलईडी फ्लॅशसह प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. दुसऱ्या रियर कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र मिळाली नाही. फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 6000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मिळेल. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी रियलमीचा मोठा डाव; Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक
Tecno Pova Neo 5G price
रिपोर्ट्स नुसार Tecno Pova Neo 5G ची किंमत भारतात 17,000 रुपये ते 19,000 रुपये या दरम्यान असू शकते. फोन Sapphire Black आणि Sprint Blue कलरमध्ये सादर केला जाईल.
