Nokia 225 4G वरील ईएमआय ऑफर्सची माहिती; अ‍ॅमेझॉन इंडियावरून घ्या विकत

तुम्ही जर स्वतःसाठी किंवा तुमच्या नातेवाईकांसाठी एक 4G Mobile विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज Nokia 225 4G Phone फक्त 618 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेण्याचा प्लॅन सांगणार आहोत. Nokia 225 4G Phone भारतात quick dialing, voice recorder आणि external radio सारख्या फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. या मोबाइलची किंमत 3,710 रुपये परंतु, 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा फोन तुम्ही ईकॉमर्स वेबसाइट Amazon india वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेऊ शकता. उर्वरित रक्कम तुम्ही सहज सुलभ EMI ऑप्शनच्या माध्यमातून फेडू शकता. चला जाणून घेऊया कशाप्रकारे हा फोन बिनव्याजी विकत घ्यायचा ते.

618 रुपयांमध्ये Nokia 4G Mobile

Nokia 225 4G Mobile कंपनीच्या साइटवर 3,249 रुपयांमध्ये विकला जात आहे. अ‍ॅमेझॉनवर या फोनसाठी 461 रुपये जास्त द्यावे लागतील. परंतु इथे तुम्ही नो कोस्ट ईएमआयवर हा फोन विकत घेता येईल. Amazon वर Bajaj Finserv आणि Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा 4G फोन बिनव्याजी विकत घेता येईल. हे देखील वाचा: स्वस्त आणि दमदार! नवीन Nokia C31 देऊ शकतो Realme आणि Redmi ला तगडे आव्हान

Nokia 225 4G Mobile Sale On Amazon India Emi Rs 618 4G Jio Sim Works On This Phone

अ‍ॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्डनं हा फोन विकत घेतल्यास तुम्हाला 618 रुपयांचे 6 EMI किंवा 1237 रुपयांचे 3 EMI द्यावे लागतील. तर Bajaj Finserv च्या कार्डनं 1237 रुपयांचे 3 EMI द्यावे लागतील.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 225 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन पॉलीकार्बोनेट बॉडीसह येतो जो टी9 न्यूमरिक कीपॅडला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 320 x 240 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 2.4 इंचाचा क्यूवीजीए एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याच्या वरच्या भागात स्पिकर मिळतो तर खाली कीपॅड आहे. फोन डिस्प्लेवर नेव्हिगेशन की देखील देण्यात आली आहे. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर

Nokia 225 4G Mobile Sale On Amazon India Emi Rs 618 4G Jio Sim Works On This Phone

नवीन नोकिया 225 4जी फोन 1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणाऱ्या UNISOC प्रोसेसरवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 32 जीबी मायक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन 4जी वोएलटीई कनेक्टिव्हिटीसह येतो जो इंटरनेट ब्राउजिंग सोबतच एचडी वोएलटीई व्हॉइस कॉलिंगला सपोर्ट करतो. Nokia 225 4G च्या बॅक पॅनलवर 3 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा मोबाइल फोन फ्लॅशलाईटला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये quick dialing, voice recorder आणि external radio सारखे फीचर्स आहेत. हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात दोन्ही सिम वर 4जी नेटवर्क वापरता येतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here