टेक्नोनं अलीकडेच भारतीय बाजारात आपला तगडा 5जी मोबाइल फोन Tecno Pova Neo 5G लाँच केला आहे ज्याची प्राइस 15,499 रुपये आहे. टेक्नो पोवा नियो 5जी 6,000mAh Battery, 50MP Camera, 120Hz Display आणि MTK Dimensity 810 5G Processor ला सपोर्ट करतो. आता कंपनीनं आंतरराष्ट्रीय बाजारात Tecno Pova Neo 2 देखील सादर केला आहे, त्यापेक्षा तगड्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच झाला आहे. ज्यात 7000mAh ची बॅटरी, 6GB RAM, मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट आणि 16MP चा कॅमेरा मिळतो.
Tecno Pova Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो पोवा नियो 2 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 20.5ः9 अॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंच की एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या फोनचे डायमेंशन 170.86 x 77.79 x 9.63 एमएम आहे. हे देखील वाचा: 70 हजारांपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये मिळेल 120 km ची रेंज, पाहा यादी
Tecno Pova Neo 2 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 8.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी टेक्नो स्मार्टफोन टेक्नो पोवा नियो 2 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Pova Neo 2 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी मोबाइल फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: BSNL चा पैसा वसूल प्लॅन! 130 दिवस डेली Unlimited Data आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सविस्तर
Tecno Pova Neo 2 ची किंमत
टेक्नो पोवा नियो 2 कंपनीनं सध्या रशियन मार्केटमध्ये लाँच केला आहे जिथे या फोननं दोन व्हेरिएंट्समध्ये एंट्री घेतली आहे. Tecno Pova Neo 2 बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RUB 11,990 (जवळपास 17,000 रुपये) आहे. तसेच Tecno Pova Neo 2 6GB + 128GB व्हेरिएंट RUB 13,990 (जवळपास 20,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन Uranolite Gray, Virtual Blue आणि Orange Magma कलरमध्ये लाँच केला गेला आहे.
