70 हजारांपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये मिळेल 120 km ची रेंज, पाहा यादी

Best Electric Scooters Under Rs 70000 With 120 Km Range

Best electric scooter under 70000: देशात फेस्टिवल सीजन सुरु होणार आहे. या निमित्ताने कंपन्या आपल्या व्हेईकल्सवर जबरदस्त सूट देत आहेत. याकाळात जर तुम्ही एखादी इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे मोठी रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील किफायतशीर रेंजमध्ये मिळत आहेत आणि Electric Scooter च्या खरेदीवर सरकार सब्सिडी देखील देत आहे. जर तुमचं बजेट 70 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास देखील तुम्ही मोठी रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता. पुढे आम्ही या रेंजमध्ये येणाऱ्या काही चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी दिली आहे.

Hero Electric Optima CX

Best Electric Scooters Under Rs 70000 With 120 Km Range

हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. भारतीय बाजारात हीरोची इलेक्ट्रिक स्कूटर खूप लोकप्रिय आहे. Hero Electric Optima CX ची किंमत 62,355 रुपयांपासून सुरु होते. ही स्कूटर 0.55 kW (0.73 bhp) ची पावर देते. दोन्ही बाजूंना कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह पुढे आणि मागे दोन्ही ड्रम ब्रेक आहेत. ही स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे सिटी स्पीड (HX) आणि कंफर्ट स्पीड (LX). तसेच चार कलर ऑप्शन देखील मिळतात. HX व्हेरिएंट स्कूटरचं हाय-स्पीड व्हर्जन आहे. यात दोन बॅटरी पर्यंत मिळतात – सिंगल बॅटरी आणि ड्युअल बॅटरी, जे अनुक्रमे 82 km आणि 122 km ची रेंज फुल चार्जमध्ये देतात. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 45 km इतका आहे. हे देखील वाचा: 6,041 रुपयांच्या हप्त्यावर अ‍ॅमेझॉनवर मिळतेय इलेक्ट्रिक स्कूटी! फक्त 10 स्टेप्समध्ये मिळेल Free Home Delivery

Bounce Infinity E1

Best Electric Scooters Under Rs 70000 With 120 Km Range

Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 55,114 रुपयांपासून सुरु होते. हिचे दोन व्हेरिएंट आणि 5 कलर ऑप्शन बाजारात उपलब्ध आहेत. ही स्कूटर मोटरद्वारे 1.5 kW (2 bhp) पवार जेनरेट करते आणि यात दोन्हीकडे डिस्क ब्रेक आहेत, ज्यात दोन्ही चाकांवर एक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम मिळते. BLDC मोटर 83Nm पर्यंतचा टार्क देते आणि ताशी 65 km चा टॉप-स्पीड देण्याचा दावा कंपनीनं केला आहे. 48V39Ah ची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास घेते आणि एकदा चार्ज केल्यावर 85 km ची रेंज मिळते. बाउंस इनफिनिटी ई1 सब्सस्क्रिप्शन बेस्ड बॅटरी प्लॅनसह येते ज्यात युजर्स बाउंसच्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कमधून बॅटरी-ए-ए-सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. हिच्या सीटमध्ये स्टोरेज स्पेस देखील जास्त आहे. स्कूटर 780 mm ची सीट उंची आणि 155 mm ग्राउंड क्लियरन्ससह येते. यात रेट्रो आणि मॉडर्न स्टाइलचं मिश्रण देण्यात आलं आहे. स्कूटरमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, इंटीग्रेटेड एलईडी डे-टाइम रनिंग लाइट, ब्लूटूथसह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अलॉय व्हील, एलईडी टेललाइट इत्यादी फिचर मिळतात.

Okinawa Ridge Plus

Best Electric Scooters Under Rs 70000 With 120 Km Range

तुम्हाला 70 हजार रुपयांपेक्षा कमी रेंजमध्ये ओकिनाव्हा रिज प्लस (Okinawa Ridge Plus) इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेता येईल. ओकिनाव्हा रिज प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 67,052 रुपयांपासून सुरु होते. ही स्कूटर आपल्या मोटरद्वारे 0.8 kW (1 bhp) पावर उत्पन्न करते आणि यात इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टमसह फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक आहेत. ही स्कूटी लिथियम-आयन बॅटरी पॅकसह बाजारात आली आहे, जी पूर्णपणे चार्ज झाल्यावर 120 KM पर्यंत अंतर पार करू शकते. हिची बॅटरी फुल चार्ज होण्यास जवळपास 2-3 तास लागतात. ओकिनाव्हा रिज प्लसचा टॉप स्पीड ताशी 55 km इतका आहे. हे देखील वाचा: Hero Electric Scooter च्या लाँचच मुहूर्त ठरला; TVS आणि Ola ला देणार टक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here