Home बातम्या धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Redmi 6A Blast ची एक बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती ज्यात Xiaomi Phone मध्ये स्फोट झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता आता उत्तरप्रदेश (UP) मध्ये देखील अशीच एक दुर्घटना घडली आहे, जिथे Mobile Phone Explode झाल्यामुळे एका 8 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ज्या मोबाइलमध्ये धमाका झाला आहे तो एक keypad phone असल्याचं सांगण्यात आलं आहे जो चार्जिंग दरम्यान ब्लास्ट झाला आहे.

उत्तरप्रदेश मधील दुर्घटना

फोन ब्लास्टची ही दुर्घटना उत्तरप्रदेशमधील बरेलीमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने जवळपास 6 महिन्यांपूर्वी एक नवीन कीपॅड असलेला मोबाइल फोन विकत घेतला होता. गेल्या रविवारी तिने हा मोबाइल फोन चार्जिंगला लावून ठेवला होता तसेच फोनच्या कडेला त्या महिलेची 8 महिन्याची मुलगी झोपली होती. हे देखील वाचा: सर्वांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या 5G Smartphone चा पहिला सेल आज; 6GB RAM आणि 5000mAh बॅटरी

चार्जिंगवर असतानाच फोनमध्ये धमाका झाला आणि हा ब्लास्ट इतका खतरनाक होता की फोनच्या बाजूला झोपलेल्या मुलीचा जागेवर मृत्यू झाला. तपासातून समोर आले आहे की या कीपॅड मोबाइलची बॅटरी आधीच फुगली होती. दुर्घटनेच्या वेळी ज्या सॉकेटमध्ये फोन चार्जिंगला लावण्यात आला होता तो सोलर पॅनलशी जोडलेला होता. त्यामुळे अनबॅलेन्स्ड करंटमुळे फोनचे नुकसान झाले होते आणि त्याच्या बॅटरीचा स्फोट झाला.

Redmi 6A Blast

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपला रेडमी 6ए स्मार्टफोन बिछान्यावर उशीला कडेला ठेऊन झोपली होती. महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा अचानकपणे तिच्या उशीवर ठेवण्यात आलेल्या शाओमी फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की तेव्हा महिलेच्या डोक्याला मार बसला होता तसेच अंथरुणातच तिचा मृत्यू झाला. हे देखील वाचा: वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा

ट्वीटवर रेडमी तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना टॅग केल्यानंतर कंपनीकडून उत्तर आलं आहे तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचा दिलासा देण्यात आला आहे. परंतु या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देईल की नाही हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. त्यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की Xiaomi Redmi 6A Blast च्या मागे कंपनी आपल्या प्रोडक्ट मधील दोष मान्य करेल की युजरची चूक म्हणून खापर युजरवर फोडेल, ही देखील महत्वाची बाब म्हणता येईल.