वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा

चीनी ब्रँड Xiaomi सध्या जास्त चर्चेत आहे परंतु त्यामागील कारण काही चांगलं नाही. कंपनीचे स्मार्टफोन्स तर कमी किंमतीत चांगले फीचर्स देत आहेत परंतु ED ची रेड, Phone Blast आणि MIUI Update मध्ये गडबड सारख्या बातम्यांमुळे कंपनीची प्रतिमा मालिन होत आहे. या ड्रमण्यां शाओमीनं आपल्या युजर्ससाठी Free Repair Service ऑफर सादर केली आहे ज्यात Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max मोफत रिपेयर केला जात आहे.

शाओमीची फ्री रिपेयर सर्व्हिस

शाओमी आपल्या फॅन्सना भेट म्हणून फ्री रिपेयर सर्व्हिस देत आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. उलट कंपनीनं अलीकडे जारी केलेल्या अपडेटनंतर अनेक रेडमी नोट 10 प्रो आणि नोट 10 प्रो मॅक्स मॉडेल बिघडू लागले आहेत तसेच या स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा व्यवस्थित काम करत नाही. कंपनी त्या रेडमी युजर्सचे फोन फ्रीमध्ये रिपेयर करेल ज्यांचे फोन्स शाओमी मीयुआयच्या नवीन अपडेटमुळे बिघडले आहेत.

यात वॉरंटीमध्ये नसलेल्या फोन्सचा समावेश असेल की नाही याची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु काही युजर्सनी कंपनीच्या ट्विटर हँडलवर केलेल्या संवादाचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, ज्यात आऊट ऑफ वॉरंटी असलेले डिवाइस देखील मोफत दुरुस्त केले जातील असा रिप्लाय देण्यात आला आहे. हे देखील वाचा: दमदार बॅटरी आणि वेगवान चार्जिंग परवडणाऱ्या किंमतीत; itel च्या आगामी स्मार्टफोनची डिजाइन लीक

शाओमी फोन्समध्ये बिघाड

Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max मध्ये सध्या सर्वात जास्त समस्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उपरोक्त स्मार्टफोन्सचे अनेक युजर्सना मोबाइल फोन्समध्ये MIUI 13 अपडेट केल्यानंतर समस्या येत आहे. ज्यामुळे Instagram किंवा Snapchat सारखं थर्ड पार्टी अ‍ॅप ओपन केल्यावर त्यांचा कॅमेरा क्रॅश होत आहे. हे अ‍ॅप्स वापरत असताना फोनचा कॅमेरा काम करत नाही आणि शाओमीनं मान्य केलंय की ही समस्या नवीन मीयुआय अपडेटमुळे आली आहे.

xiaomi giving free repair service to redmi note 10 pro max users after miui 13 update camera problem

Redmi Note 10 Pro Price in India

रेडमी नोट 10 प्रो भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या 6GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 15,999 रुपये तर 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सेल्फ ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीसह येतेय Xiaomi ची इलेक्ट्रिक कार; मिळणार थक्क करणारे फीचर्स

Redmi Note 10 Pro Max Price in India

रेडमी नोट 10 प्रो मॅक्स देखील दोन व्हेरिएंट्समध्ये विकला जात आहे. यातील 6GB RAM + 128GB Storage व्हेरिएंटची प्राइस 17,999 रुपये आहे तर 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here