Xiaomi sub-brand Redmi च्या नोट 12 सीरीजचे तीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी अजून एक नवीन मोेबाइल या सीरीजमध्ये जोडण्याची तयारी करत आहे जो Redmi Note 12 4G नावानं लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे त्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच नोट 12 4जी ग्लोबल मार्केटसह भारतात देखील लाँच करू शकते. पुढे या फोनच्या सर्टिफिकेशनसह संभाव्य स्पेसिफिकेशन्स देखील शेयर करण्यात आले आहेत.
Redmi Note 12 4G लाँच
Redmi Note 12 4G फोन IMEI database मध्ये स्पॉट झाला आहे. इथे फोन Tapas कोडनेमसह लिस्ट करण्यात आला आहे तसेच फोनचे दोन मॉडेल नंबर 23028RA60L आणि 23021RAAEG समोर आले आहेत. सर्टिफिकेशन मध्ये फोन लाँच संबंधित कोणतीही मोठी माहिती समोर आली नाही, परंतु लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की आता हा रेडमी फोन लवकरच ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. परंतु Redmi Note 12 4G भारतात कधी येईल हे देखील स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: Amazon Great Republic Day Sale 2023: 5G स्मार्टफोनवर मिळत आहेत या दमदार डील्स
Redmi Note 12 4G Specifications
रेडमी नोट 12 4जी मॉडेल बद्दल समोर आलेले लीक्स पाहता, असं बोललं जात आहे की हा मोबाइल फोन मीडियाटेकच्या हीलियो जी99 चिपसेटसह ग्लोबल मार्केटमध्ये येऊ शकतो. या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स मार्केटमध्ये येऊ शकतात. एका मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.
Redmi Note 12 4G फोनमध्ये किती इंचाची स्क्रीन मिळेल हे समजलं नाही परंतु लीकनुसार हा स्मार्टफोन अॅमोलेड पॅनल डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 12 4जी फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Indian Gadget Awards 2022: इथे पाहा मोबाइल अवॉर्डच्या कॅटेगरी आणि त्यातील नॉमिनी
Redmi Note 12 5G
भारतात रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 17,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 19,999 रुपये आहे. Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेट, 48MP ट्रिपल रियर कॅमेरा, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.67 इंच एफएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले आणि 33वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000mAh Battery या फोनची खासियत आहे.
