हे आहेत देशातील सर्वात मोठ्या मोबाइल अवॉर्डचे विजेते

Highlights

 • Indian Gadget Award 2022 मध्ये एकूण 28 अवॉर्ड कॅटेगरीज होत्या
 • 24 अवॉर्ड कॅटेगरीजमध्ये जूरी मेंबर्सनी निवडले विजेते
 • 4 कॅटेगरी युजर्स चॉईसच्या होत्या
 • सर्व कॅटेगरीच्या विजेत्यांची घोषणा 31 जानेवारीला करण्यात आली

देशातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी इव्हेंट इंडियन गॅजेट्स अवॉर्ड 2022 ची सांगता झाली आहे. यंदा हा अवॉर्ड शो आणखी मोठा आणि शानदार होता. कारण गेली दोन वर्ष हा शो ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. यंदा ऑफलाइन इव्हेंटचा अंदाज हटके होता. ज्युरी आणि अवॉर्ड कॅटेगरी बद्दल बोलायचं झालं तर यावेळी एकूण 28 अवॉर्ड कॅटेगरी होत्या ज्यात 150 पेक्षा जास्त नॉमिनीज होते. तसेच 18 ज्युरी मेंबर्सचा समावेश होता ज्यांनी 24 कॅटेगरीमधील विजेत्यांची निवड केली आहे, तर 4 कॅटेगरी युजर्स चॉईससाठी ठेवण्यात आल्या होत्या. 31 जानेवारीला झालेल्या इव्हेंटमधून घोषित करण्यात आलेल्या 8 स्मार्टफोन कॅटेगरीमधील विजेत्यांची यादी आम्ही पुढे दिली आहे. या सर्व कॅटेगरीजची सविस्तर माहिती, नॉमिनी आणि त्यातील विजेत्यांची पुढे सविस्तर माहिती दिली आहे. Indian Gadget Awards 2022 संबधित सर्व माहिती तुम्ही या वेबासइटवरून मिळवू शकता. तसेच युजर्स अवॉर्डच्या वोटिंगची माहिती देखील तुम्हाला इथेच मिळेल.

Indian Gadget Awards 2022 च्या कॅटेगरी

 • Best Phone of 2022 (under 15k)
 • Best Phone of 2022 (under 30k)
 • Best Phone of 2022 (under 50k)
 • Best Selfie Phone of 2022 – Mainstream
 • Best Camera Phone of 2022 – Mainstream
 • Best Camera Phone of 2022 – Premium
 • Best Gaming Phone of 2022
 • Phone Of The Year

1.Best Phone of 2022 (under 15,000)

 • Samsung Galaxy F23 5G
 • Motorola Moto G62 5G
 • iQOO Z6 5G
 • Realme 9i
 • Redmi 11 Prime 5G
 • Infinix Note 12 5G

नावावरून समजलं असेल की या कॅटेगरीमध्ये आम्ही वर्षभरातील त्या बेस्ट स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे ज्यांनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये आपला जलवा दाखवला आहे. भारतात या कॅटेगरीचा वापर करणाऱ्या मोबाइल युजर्सची संख्या लाखात आहे. The Indian Gadget Awards मध्ये बेस्ट फोन 2022 नॉमिनी (15,000 रुपयांच्या बजेटमध्ये) Samsung Galaxy F23 5G, Motorola Moto G62 5G, iQOO Z6 5G, Realme 9i, Redmi 11 Prime 5G आणि Infinix Note 12 5G नॉमिनेट झाले आहेत.

सर्वाधिक खप असलेल्या या कॅटेगरीमध्ये विजेता ठरला आहे Motorola Moto G62 5G!

2.Best Phone of 2022 (under 30,000)

 • TECNO CAMON 19 Pro Mondrian
 • POCO F4 5G
 • Redmi K50i 5G
 • OnePlus Nord 2T 5G
 • Xiaomi 11i HyperCharge 5G
 • Motorola Edge 30
 • Samsung Galaxy M53 5G
 • Realme GT NEO 3T 80W
 • iQOO Neo 6
 • Redmi Note 11 Pro + 5G
 • Realme 9 Pro+

30,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन शोधणं म्हणजे अत्यंत कठीण काम. या कॅटेगरीमध्ये फक्त त्या मोबाइल्सचा समावेश करण्यात आला ज्यांची किंमत 15 हजारांपेक्षा जास्त आणि 30 हजारांपेक्षा कमी आहे. हे फोन ना धड मिडबजेटमध्ये येत नाहीत आणि ना धड प्रीमियम बनतात. या कॅटेगरीमध्ये TECNO CAMON 19 Pro Mondrian, POCO F4 5G, Redmi K50i 5G, OnePlus Nord 2T 5G, Xiaomi 11i HyperCharge 5G, Motorola Edge 30, Samsung Galaxy M53 5G, Realme GT NEO 3T 80W, iQOO Neo 6, Redmi Note 11 Pro + 5G आणि Realme 9 Pro+ चा समावेश करण्यात आला आहे.

या कॅटेगरीमधील 11 स्मार्टफोन्सना मात देऊन OnePlus Nord 2T 5G विजयी ठरला आहे.

3.Best Phone of 2022 (under 50,000)

 • Nothing Phone (1)
 • OnePlus 10T 5G
 • iQOO 9T
 • Motorola Edge 30 Fusion
 • Realme GT 2 Pro
 • Realme GT NEO 3
 • OPPO Reno8 Pro 5G
 • Vivo V25 Pro
 • Samsung Galaxy S21 FE 5G

50,000 रुपये खर्च केल्यावर जर कोणी नवीन स्मार्टफोन घेत असेल तर त्याला अपेक्षा असते की या हायएन्ड डिवायसचा प्रत्येक पैलू दमदार असावा. अशा 9 शक्तिशाली आणि विश्वासू मोबाइल्स फोन्स आयजीएच्या मंचावर एकमेकांशी भिडतील. या लिस्टमध्ये Nothing Phone (1), OnePlus 10T 5G, iQOO 9T, Motorola Edge 30 Fusion, Realme GT 2 Pro, Realme GT NEO 3, OPPO Reno8 Pro 5G, Vivo V25 Pro आणि Samsung Galaxy S21 FE 5G चा समावेश करण्यात आला आहे. या कॅटेगरीमध्ये वनप्लसच्या स्मार्टफोनचा समावेश आहे तर नवख्या नथिंग फोन देखील दिग्गजांच्या पंक्तीत बसला आहे.

50,000 रुपयांच्या आतील बेस्ट फोनच्या कॅटेगरीमध्ये iQOO 9T नं बाजी मारली आहे.

4.Best Selfie Phone of 2022 – Mainstream

 • Motorola Edge 30
 • TECNO CAMON 19 Pro Mondrian
 • Redmi K50i 5G
 • Samsung Galaxy M53 5G
 • OnePlus Nord 2T 5G
 • Realme 9 Pro+
 • OPPO Reno8 5G
 • Vivo V25 5G
 • Samsung Galaxy A53 5G

‘सेल्फीचं वेड’ तर अनेकांना असतं परंतु बेस्ट सेल्फी घेणं प्रत्येकाला जमत नाही. IGA 2022 ची ही कॅटेगरी खास करून त्या मोबाइल फोन्ससाठी बनवण्यात आली आहे ज्यांनी आपल्या फ्रंट कॅमेऱ्याच्या जीवावर सेल्फीला शानदार बनवलं आहे. या कॅटेगरीमध्ये नऊ स्मार्टफोन्सनी नॉमिनी म्हणून दावा सादर केला आहे ज्यात Motorola Edge 30, TECNO CAMON 19 Pro Mondrian, Redmi K50i 5G, Samsung Galaxy M53 5G, OnePlus Nord 2T 5G, Realme 9 Pro+, OPPO Reno8 5G, Vivo V25 5G आणि Samsung Galaxy A53 5G नं वर्णी लावली आहे.

बेस्ट सेल्फी फोन 2022 चा खिताब Vivo V25 5G ला देण्यात आला आहे.

5. Best Camera Phone of 2022 – Mainstream

 • Realme 9 Pro+
 • iQOO Neo 6
 • Realme GT NEO 3T
 • OnePlus Nord 2T 5G
 • Samsung Galaxy M53 5G
 • Motorola Edge 30

कॅमेऱ्याचा उल्लेख केल्यावर फ्रंट कॅमेऱ्याआधी रियर कॅमेऱ्याचा विचार येतो. स्वतःचा फोटो सर्वच घेतात परंतु अस्सल फोटोग्राफर तो जो कॅमेऱ्याच्या लेन्समधून जगातील सौंदर्य मोबाइलमध्ये कॅप्चर करण्याचं काम आवडीनं करतो. IGA 2022 मध्ये बेस्ट कॅमेरा फोन 2022 (मेनस्ट्रीम) ची कॅटेगरी देखील बनवण्यात आली आहे ज्यात त्या मोबाइल फोन्सचा समावेश करण्यात आला ज्यांचा कॅमेरा युजर्सना आवडला आहे. या कॅटेगरीचे नॉमिनी आहेत Realme 9 pro plus, iQOO Neo 6, Realme GT NEO 3T, OnePlus Nord 2T 5G, Samsung Galaxy M53 5G आणि Motorola Edge 30.

बेस्ट कॅमेरा फोन 2022 मेनस्ट्रीमचा मान Realme 9 Pro+ मिळवला आहे.

6. Best Camera Phone of 2022 – Premium

 • Samsung Galaxy S22 Ultra 5G
 • Google Pixel 7 Pro
 • Apple iPhone 14 Pro Max
 • Vivo X80 Pro
 • Xiaomi 12 Pro
 • Motorola Edge 30 Ultra

प्रीमियम स्मार्टफोन्स विकत घेताना त्यात कॅमेरा बेस्ट असेल हे अपेक्षितच असतं. कॅमेरा तर सर्व फोन्समध्ये असतो परंतु अस्सल कॅमेरा फोन त्याला म्हणता येतं ज्याची लेन्स जबरडारदस्त आणि सेन्सर शानदार असेल. IGA 2022 मध्ये यंदाचा बेस्ट कॅमेरा फोन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि यात आपली दावेदारी सादर करण्यासाठी समोर आले आहेत Samsung Galaxy S22 Ultra 5G, Google Pixel 7 Pro, Apple iPhone 14 Pro Max, Vivo X80 Pro, Xiaomi 12 Pro आणि Motorola Edge 30 Ultra सारखे कमाल कॅमेरा फोन्स.

बेस्ट कॅमेरा फोन 2022 प्रिमीयम या कॅटेगरीचा विजेता आहे Samsung Galaxy S22 Ultra 5G.

7. Best Gaming Phone of 2022

 • iQOO 9T 5G
 • Redmi K50i 5G
 • Realme GT Neo 3
 • Apple iPhone 14 Plus
 • Apple iPhone 14 Pro Max
 • Vivo X80
 • ASUS ROG Phone 6 Pro
 • Samsung Galaxy S22 Ultra 5G
 • OnePlus 10T 5G

यावर्षी मोबाइल फोनमध्ये फक्त कॅमेरा आणि लुकला महत्व देण्यात आलं नाही. तर अनेक अ‍ॅस्पेक्ट्ससह नवीन फोन खरेदी करणाऱ्या युजर्सनी हा पॉईंट देखील चेक केला की मोबाइलमध्ये गेम परफॉर्मन्स कशी आहे. या बदलत्या ट्रेंडचा देखील IGA 2022 मध्ये बेस्ट गेमिंग फोन्सच्या कॅटेगरीच्या स्वरूपात समावेश करण्यात आला आहे. यंदा Best Gaming Phone of 2022 साठी नॉमिनी ठरले आहेत iQOO 9T 5G, Redmi K50i 5G, Realme GT Neo 3, Apple iPhone 14 Plus, Apple iPhone 14 Pro Max, Vivo X80, ASUS ROG Phone 6 Pro, Samsung Galaxy S22 Ultra 5G आणि OnePlus 10T 5G.

ASUS ROG Phone 6 Pro बेस्ट गेमिंग फोन 2022 म्हणून विजयी झाला आहे.

8. Phone of the Year

 • Samsung Galaxy S22 Ultra
 • Google Pixel 7 Pro
 • Apple iPhone 14 Pro Max
 • Vivo X80 Pro
 • Xiaomi 12 Pro 5G
 • Motorola Edge 30 Ultra
 • Samsung Galaxy Z Fold4
 • Samsung Galaxy Z Flip4
 • OnePlus 10 Pro 5G
 • iQOO 9 Pro
 • Realme GT 2 Pro

या कॅटेगरीचा विजेता बनण्यासाठी सर्वच बाबतीत फोननं चांगली परफॉर्मन्स देणं आवश्यक आहे. आज मार्केटमध्ये एका फोनचा लुक आकर्षक आहे तर एकाच कॅमेरा कमाल आहे. एका मोबाइलची प्रोसेसिंग फास्ट आहे तर एकाची बॅटरी पावरफुल आहे. एक स्मार्टफोनमध्ये जर सर्व वैशिष्ट्ये असतील तर तो बनतो Phone of the Year. ही आहे IGA 2022 ची सर्वात स्पेशल कॅटेगरी. यंदा Phone of the Year साठी दावेदार बनले आहेत Samsung Galaxy S22 Ultra, Google Pixel 7 Pro, Apple iPhone 14 Pro Max, Vivo X80 Pro, Xiaomi 12 Pro 5G, Motorola Edge 30 Ultra, Samsung Galaxy Z Fold4, Samsung Galaxy Z Flip4, OnePlus 10 Pro 5G, iQOO 9 Pro आणि Realme GT 2 Pro स्मार्टफोन.

फोन ऑफ द इयर 2022 हा अवार्ड Samsung Galaxy S22 Ultra ला देण्यात आला आहे.

Indian Gadget Awards 2022 संबंधित संपूर्ण माहितीसाठी या वेबाससाइटला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here