Samsung Galaxy A32 4G कंपनीने ग्लोबली लॉन्च केला आहे. याआधी कंपनीने Galaxy A32 5G मॉडेल सादर केला होता. 4G आणि 5G मॉडेल बोलायचे तर दोन्ही फोनची डिजाइन एकसारखी आहे. फीचर्सच्या बाबतीत थोडे वेगळे आहेत. Samsung ने कन्फर्म केले आहे कि Galaxy A-सीरीजचा हा नवीन फोन Galaxy A32 4G लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. सॅमसंगने काल एक प्रेस रिलीज जारी करून घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात हा फोन लॉन्च करेल. (samsung galaxy a32 launch in india soon with 64mp camera 5000mah battery)
सॅमसंग वेबसाइटवर झाला लिस्ट
सॅमसंग इंडिया वेबसाइटवरील सपोर्ट पेजनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए32 SM-A326B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. सपोर्ट पेजवरून हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करेल कि नाही हे मात्र समजले नाही. पण, ग्लोबली या फोनचा 4G वेरिएंट लॉन्च झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि फोन भारतात 4G कनेक्टिविटी सोबतच येईल.
हे देखील वाचा : 12GB रॅम आणि 4,300mAh बॅटरीसह लॉन्च झाला ताकदवान फोन Oppo Reno 5K
भारतात या फीचर्ससह येईल
Samsung ने दिलेल्या माहितीनुसार Galaxy A32 64MP क्वाड कॅमेरा आणि sAMOLED 90Hz डिस्प्लेसह सादर केला जाईल. इतकेच नव्हे तर फोनमध्ये मागे 64MP मेन कॅमेऱ्यासह अल्ट्र वाइड लेंस, मॅक्रो लेंस आणि डेप्थ कॅमेरा असेल. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाईल. या बॅटरीसह Galaxy A32 मध्ये 20 तसंच व्हिडीओ प्लेबॅक मिळेल. कंपनीने Galaxy A32 फोनच्या भारतातील लॉन्च आणि काही फीचर्स व्यतिरिक्त कोणतीही माहिती दिली नाही.
हे देखील वाचा :Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4-इंच FHD+ AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 800nits ब्राइटनेस आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. तसेच फोनमध्ये MediaTek Helio G80 SoC सह Mali-G52 2EEMC2 GPU आहे. हँडसेट मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. युजर्स फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतात.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A32 मध्ये क्वाड कॅमेरा मागे देण्यात आला आहे. यात 64MP (f/1.8 अपर्चर) प्राइमरी सेंसर, 8MP (f/2.2 अपर्चर) अल्ट्रा-वाइड लेंस, 5MP (f/2.2 अपर्चर) डेप्थ सेंसर आणि 5MP (f/2.4 अपर्चर) मॅक्रो लेंस आहे. फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी काम करेल.
फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4G LTE, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनचा आकार 73.6 x 158.9 x 8.4mm आणि वजन 184 ग्राम आहे. फोन अँड्रॉइड 11-बेस्ड OneUI 3.0 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
किंमत
सॅमसंग गॅलेक्सी A32 चा 4GB + 64GB आणि 19,990 rubles (जवळपास 21,600 रुपये) आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,990 rubles (जवळपास 21,600 रुपये) असेल. फोन Russia मध्ये Awesome Black, Awesome Blue, Awesome Violet आणि Awesome White कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल.
















