Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम

Redmi K40 सीरीज आज चीन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या सीरीज मध्ये Redmi K40, K40 Pro आणि K40 Pro Plus आणले आहेत. कंपनीनुसार सीरीजमध्ये जगातील सर्वात छोटा सेल्फी कॅमेरा कटआउट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर Redmi K40 सीरीज AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि ड्यूल स्टीरियो स्पीकरसह आली आहे. चीन व्यतिरिक्त हि सीरीज दुसऱ्या देशांमध्ये कधी सादर केली जाईल याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तुम्हाला या आर्टिकल मध्ये आम्ही या सीरीज मधील सर्वात छोटा वेरिएंट म्हणजे रेडमी के40 बाबत माहिती देणार आहोत.(xiaomi redmi k40 launched with 12gb ram world small punch hole price specification)

डिजाइन व लुक

Redmi K40 चा लुक पाहता हा फोन बेजललेस डिस्प्लेवर बनवण्यात आला आहे ज्यात स्क्रीनच्या वर मध्यभागी पंचहोल देण्यात आला आहे. यात होल-पंच सेल्फी कॅमेरा आहे आणि याचा आकार फक्त 2mm आहे. डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह येतात. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बऱ्याच अंशी मी 11 स्मार्टफोन सारखा आहे. या सेटअप मध्ये दोन लेंस मोठ्या आहेत तर डावीकडे छोटासा सेंसर आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

डिस्प्ले

या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा AMOLED E4 ट्रूटोन डिस्प्ले देण्यात आला आहे जो सॅमसंगने बनवला आहे. फोन फुल एचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ ला सपोर्ट करतो. याची अधिकतम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे आणि यह 5000000: 1 कंट्रास्ट रेशियो आणि 515 पीपीआई पिक्सल डेंसिटीसह येतो. होल-पंच डिजाइनसह यात 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आहे, जो 30Hz पर्यंत पण खाली जाऊ शकतो. पॅनलचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz हर्ट्ज आहे.

पावरफुल प्रोसेसर

या किफायती प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 870 SoC दिला गेला आहे जो 5G सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे कि स्नॅपड्रॅगॉन 870 मध्ये sub-6 GHz आणि mmWave वर 5G चालू शकेल आणि हा ultra-intuitive AI सह येतो. याचा अर्थ असा आहे कि मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा प्रोसेसर शानदार आहे.

हे देखील वाचा : 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला पंच-होल सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. एकंदरीत फोन मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या मागील कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात 48 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 8 मेगापिक्सल वाइड एंगलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोनमध्ये 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने फोन फक्त 50 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus

वेरिएंट्स आणि किंमत

चीनमध्ये Redmi K40 च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत CNY 1,999 (जवळपास Rs 22,400), 8GB + 128GB ऑप्शनची किंमत CNY 2,199 (जवळपास Rs 24,700), 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 2,499 (जवळपास Rs 28,000) व 12GB + 256GB मॉडेलची किंमत CNY 2,699 (जवळपास Rs 30,000) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here