मागच्या आठवड्यात अॅप्पल बद्दल बातमी आली होती ज्यात कंपनी च्या आगामी आयफोन ची रेंडर ईमेज शेयर करण्यात आली होती. अॅप्पल बद्दल सांगण्यात आले होते की कंपनी यावर्षी एक साथ तिन नवीन आयफोन सादर करेल आणि तिन्ही फोन आयफोन 10 सारखा नॉच डिस्प्ले वाले असतील. आज अॅप्पल चा नवीन आयफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे तिथे ‘आयफोन 11’ नावाने नवीन डिवाईस लिस्ट करण्यात आला आहे.
अॅप्पल आयफोन 11 ची ही लिस्टिंग 27 जून ची आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चा मॉडल नंबर आयफोन 11,2 असा लिहिण्यात आला आहे. गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये दाखविण्यात आलेला फोन अॅप्पल द्वारा लॉन्च केल्या जाणार्या 3 आयफोंस मधील एक आहे. लिस्टिंग मध्ये फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. ज्यानुसार हा आयफोन अॅप्पल च्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम आईओएस 12.0 वर चालेल.
आयफोन 11,2 नाव असलेल्या या फोन मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच लिस्टिंग मधून समजले आहे की हा फोन 2.49गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या 6-कोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच नुसार नवीन आयफोन मध्ये डी321एपी मदरबोर्ड मिळू शकतो. गीकबेंच वर आयफोन 11 ला सिंगल-कोर मध्ये 4673 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 10912 स्कोर देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अॅप्पल बद्दल बोलले जात आहे की सप्टेंबर मध्ये कंपनी तिन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस नॉच डिस्प्ले वाले असतील. दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले सह येतील ज्यात 6.5-इंच आणि 5.8-इंचाची स्क्रीन मिळू शकते. तर एक 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह येऊ शकतो.















