ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर Amazon Prime Day सेल सुरु झाला आहे. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या प्राईम डे सेल दरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीपासून अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला तुमचा टीव्ही सेट बदलून अपग्रेड करायचा असेल तर अॅमेझॉन प्राईम डे सेल सर्वात चांगली संधी देत आहे. अॅमेझॉनवर सध्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर मिळत आहेत. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर OnePlus, Samsung, Xiaomi आणि अन्य ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान मिळणाऱ्या स्मार्ट टीव्ही डील्सची माहिती दिली आहे.
Amazon Prime Day Sale in India: Best Smart TV Deals
OnePlus 43’’ Y Series 4K UHD Smart TV
वनप्लसचा Y सीरीजच्या OnePlus 43’’ Y1S Pro टीव्हीवर अॅमेझॉनवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. वनप्लसच्या या टीव्हीचे ख़ास फिचर्स पाहता यात 4K UHD, Android TV, Memc सह गामा इंजिन, OnePlus कनेक्ट इकोसिस्टम, ड्युअल-बँड वायफाय, बेजल-लेस डिजाइन, ऑक्सीजनप्ले, गेम मोड देण्यात आला आहे. तसेच वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, युट्युब, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, SonyLiv, हंगामा, JioCinema, Zee5, Eros Now, ऑक्सीजन प्ले सारखे अॅप्स मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 24W चे स्पिकर मिळतात.
प्राईस – 39,999 रुपये
डील प्राईस – 26,490 रुपये
Acer 43’’ 4K UHD Smart TV
Acer चा 43 इंचाचा 4K टीव्ही अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. एसरच्या या स्मार्ट टीव्हीचे खास फीचर्स पाहता हा Android 11 प्लॅटफॉर्मवर चालतो. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Dual Band Wifi, 2-way Bluetooth देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या टीव्हीमध्ये ब्लू लाईट रिडक्शन इंटेलिजंट फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिन आणि डायनॅमिक सिग्नल कॅलिब्रेशन देण्यात आलं आहे. तसेच टीव्हीमध्ये डिजिटल नॉइज रिडक्शन, मायक्रो डिमिंग, डॉल्बी ऑडियो सपोर्ट मिळतो. एसरच्या या टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Amazon Music, Hotstar,Spotify, Voot, VootKids, MxPlayer, SonyLiv, Hungama, Zee5, Eros Now सारखे अॅप्स प्री इंस्टॉल येतात.
प्राईस – 49,990
डील प्राईस – 22,499 रुपये
Samsung 43’’ Crystal 4K Neo LED TV
सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन क्रिस्टल 4K प्रो UHD (3840 x 2160 पिक्सल) आहे. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या स्मार्ट टीव्हीचे फिचर्स पाहता यात व्हॉइस असिस्टंट्स, स्मार्ट रिमोट, आणि PC मोड, स्क्रीन मिररिंग, टॅप व्यू मोड देण्यात आले आहेत. सॅमसंगचा हा टीव्ही टिजेन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, सोनी लिव, ज 5, युट्युब सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत जे डॉल्बी डिजिटल प्लसला सपोर्ट करतात.
प्राईस – 47,900 रुपये
डील प्राईस – 32,490 रुपये
Redmi 43’’ 4K UHD Smart LED TV
Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीचा 4K स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीचे रिजोल्यूशन फुल HD (1920×1080 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, ब्लू-रे प्लेयर, गेमिंग कंसोल पोर्ट, 2 USB पोर्ट देण्यात आला आहे. तसेत यात 3.5mm जॅक, Bluetooth 5.0 देण्यात आलं आहे. शाओमीचा हा टीव्ही आयएमडीबी इंटीग्रेशनसह पॅचवॉल 4 वर चालतो. या टीव्हीमध्ये पॅरेंटल लॉक देण्यात आला आहे. त्याचबरबर नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिज्नी+हॉटस्टार सारखे अॅप्स प्री इंस्टॉल मिळतात.
प्राईस – 42,999 रुपये
डील प्राईस – 23,499 रुपये
Amazon Basics 55’’ 4K UHD LED Fire TV
अॅमेझॉनचा 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीचे फिचर्स पाहता डिस्प्लेचं रिजोल्यूशन 4K अल्ट्रा HD (3840 x 2160 पिक्सल), रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI 2.0 पोर्ट, 1 USB 3.0 आणि 1 USB 2.0 पोर्ट , IR पोर्ट देण्यात आले आहेत. साउंड आउटपुटसाठी या टीव्हीमध्ये 20W चे पावरफुल स्पिकर देण्यात आले आहेत. अॅमेझॉनचा हा टीव्ही Fire TV OS वर चालतो. या टीव्हीमध्ये Netflix, Disney + Hotstar, YouTube सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल येतात.
प्राईस – 66,000 रुपये
डील प्राईस – 34,749 रुपये
VU 50’’ 4K Android LED TV
भारतीय टीव्ही मार्केटमध्ये VU एक विश्वासू ब्रँड म्हणून उदयास आला आहे. या ब्रँडचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही अॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 4K Ultra HD (3840×2160 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 Hz आहे. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. फीचर्स पाहता हा अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालतो. तसेच टीव्हीमध्ये ActiVoice रिमोट कंट्रोल, Google Eco-सिस्टम, Google Games, Chromecast Built-In, Bluetooth 5.0, ARC आणि ऑप्टिकल पोर्ट देण्यात आला आहे. यात YouTube, Netflix, Prime Video, Hotstar सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात.
प्राईस – 45,000 रुपये
डील प्राईस – 28,499 रुपये
Mi Horizon 40’’ Full HD Android LED TV
इंडियन स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये Xiaomi सर्वात मोठा प्लेयर आहे. शाओमीच्या Mi Horizon 40’’ स्मार्ट टीव्हीवर सर्वात जबरदस्त डील मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन फुल HD (1920×1080 पिक्सल), रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. शाओमीच्या या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि 3.5 mm पोर्ट मिळतो. साउंड आउटपुटसाठी 20 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत. हा टीव्ही Android TV 9 वर आधारित PatchWall 4 IMDb इंटीग्रेशनसह चालतो. या टीव्हीमध्ये Prime Video, Netflix, Disney + हॉटस्टार, YouTube, Apple TV, 5000+ अॅप सपोर्टेड आहेत.
प्राईस – 29,999 रुपये
डील प्राईस – 18,999 रुपये
iFFALCON 43’’ HD Smart LED TV
iFFALCON चा 43 इंचाचा हा टीव्ही अॅमेझॉनच्या सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीचे रिजोल्यूशन 4K अल्ट्रा HD (3840 x 2160 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 hz आहे. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट आणि 1 USB पोर्ट देण्यात आला आहे. साउंड आउटपुटसाठी फोनमध्ये 24 वॉट डॉल्बी ऑडियोसह स्पिकर देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये हॉटस्टार, Zee5, प्राईम व्हिडीओ, युट्युब सारखे अॅप्स मिळतात. यात हँड्स-फ्री व्हॉईस कंट्रोल फिचर देण्यात आलं आहे.
प्राईस – 47,990 रुपये
डील प्राईस – 23,499 रुपये
Candes 43’’ Full HD LED Smart Android TV
कँडस ब्रँडचा 43 इंचाचा फुल एचडी स्मार्ट टीव्ही अॅमेझॉन सेल दरम्यान डिस्काउंटसह विकत घेता येईल. Candes 43 इंच Full HD LED Smart Android TV च्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 1920x1080p पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, 1 हेडफोन जॅक, 1 AV आउटपुट स्लॉट, 1 AV इनपुट स्लॉट आणि 1 RF स्लॉट देण्यात आला आहे. हा टीव्ही अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालतो. यात प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिजनी+हॉटस्टार, सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात.
प्राईस – 38,490 रुपये
डील प्राईस – 17,999 रुपये
Redmi 32” HD Ready Smart LED TV
Xiaomi चा 32 इंचाचा बजेट टीव्ही अॅमेझॉन सेलमध्ये बेस्ट डीलसह विकत घेता येईल. या टीव्हीचं रिजोल्यूशन HD रेडी (1366 x 768 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, 3.5 mm आणि Bluetooth 5.0 आणि ड्युअल बँड वाय-फाय देण्यात आलं आहे. तसेच यात साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर मिळतात. रेडमीच्या या टीव्हीमध्ये Android TV 11 आधारित PatchWall 4 IMDb इंटीग्रेशन देण्यात आला आहे. रेडमीचा हा टीव्ही प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिजनी आणि हॉटस्टार सह YouTube, Apple TV सारख्या सुमारे 5000 पेक्षा जास्त अॅप्सना सपोर्ट करतो.
प्राईस – 24,999 रुपये
डील प्राईस – 10,499 रुपये














