OPPO नं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाईल फोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘ए’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो OPPO A77 नावानं बाजारात उपलब्ध होईल. ओप्पो ए77 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे. जो मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, MediaTek Helio G35 processor, 50MP Camera आणि 33W SuperVOOC 5,000mAh battery सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
OPPO A77 ची किंमत
ओप्पो ए77 स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट भारतात दाखल झाला आहे ज्यात 4GB RAM सह 64GB Storage देण्यात आली आहे. हा मोबाईल फोन 15,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीनं स्मार्टफोनचे Sunset Orange आणि Sky Blue कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. हा फोन ओप्पोच्या अधिकृत वेबसाईटसह ऑफलाईन बाजारात देखील उपलब्ध होईल. या हँडसेटच्या खरेदीसाठी आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर केल्यास कंपनी 1500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देखील देत आहे.
OPPO A77 चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पोचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाईल फोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे. या फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्मार्टफोन स्क्रीनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा ओप्पो मोबाईल ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.
OPPO A77 स्मार्टफोन कंपनीनं सर्वात नवीन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 12 वर लाँच केला आहे जी कलरओएस 12.1 सह मिळून चालते. प्रोसेसिंगसाठी या मोबाईल फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. ओप्पो ए77 भारतीय बाजारात 4 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी ओप्पो ए77 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्ससह चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाईल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
ओप्पो ए77 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
















