OnePlus चा 4K स्मार्ट टीव्ही छप्परफाड डिस्काउंट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर OnePlus च्या 4K स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. वनप्लसचा हा टीव्ही अ‍ॅमेझॉनवरून दहा हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर या टीव्हीवर बँक डिस्काउंट देखील मिळत आहे. OnePlus चा 43 इंचाचा 4K अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेता येईल. पुढे आम्ही तुम्हाला वनप्लसच्या Y सीरीजच्या 43 इंचाच्या 4K स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच वनप्लसच्या या टीव्हीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले आहेत.

OnePlus TV Y Series 43 inch 4K वरील ऑफर

वनप्लसचा 43 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर 39,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. म्हणजे वनप्लसचा हा टीव्ही 29999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच SBI च्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 2,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे वनप्लसचा हा टीव्ही सेलमध्ये 27,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा टीव्ही ईएमआयवर देखील विकत घेता येईल. जर तुमच्याकडे घरात जुना टीव्ही असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करून आणखी सूट मिळवू शकता.

OnePlus TV Y Series 43 inch 4K चे फीचर्स

OnePlus च्या Y सीरीजच्या या टीव्हीमध्ये 43 इंचाचा डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 4K Ultra HD (3840×2160 पिक्सल) आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. वनप्लसचा हा टीव्ही बेझल लेस डिजाइनसह येतो, ज्यात HDR10+ HDR10, HLG सपोर्ट मिळतो. तसेच हा डिस्प्ले पॅनल 1 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी MEMC सह गामा इंजिन देण्यात आलं आहे.

यात कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट देण्यात आले आहेत. तसेच 2USB पोर्ट देखील या टीव्हीमध्ये मिळतात. हा स्मार्ट टीव्ही ड्युअल बँड WiFi बँडला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 24W चे स्पीकर मिळतात. हा टीव्ही Dolby Audio आणि Dolby Atmos डिकोडिंगला सपोर्ट करतो.

यात गुगलचं Android TV प्लॅटफॉर्मवर चालतो. हा टीव्ही OnePlus Connect Ecosystem, Google Assistant, Chromecast, Miracast, DLNA, Auto Low Latency मोडला सपोर्टसह येतो. या टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारखे अ‍ॅप्स प्री इंस्टॉल मिळतात. तसेच गुगल प्ले स्टोरवरून आणखी अ‍ॅप्स डाउनलोड करता येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here