76व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G Services ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी मोठी घोषणा केली. पीएम मोदींनी देशात 5जी सेवा लवकरच सुरु होईल आणि डिजिटल भारताचं स्वप्न गावात देखील पोहोचेल, असं सांगितलं आहे. परंतु अजूनही 5G च्या लाँच डेटबाबत अजूनही काही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच, 5जी अधिकृतपणे रिलीज होण्याआधी रिलायन्स जियो आणि विआयसह टेलिकॉम ऑपरेटरनी 5 जी संबंधित प्रोडक्ट्स विकसित करण्यासाठी इंजिनियर्स नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे.
5G लाँच पूर्वीच अनेक जागा उपलब्ध
IANS च्या रिपोर्टनुसार गेल्या महिन्यात 5जी संबंधित कंपन्यांच्या जॉब पोस्टिंगमध्ये 65 टक्क्यांची वाढ दिसून झाली आहे. जानेवारीमधील 5265 जॉब पोस्टिंगवरून हा आकडा जुलैमध्ये 8667 झाला आहे. जागतिक स्थरावरील 175 कंपन्यांच्या विश्लेषणानुसार, या काळात सक्रिय नोकऱ्यांमध्ये 46 टक्क्यांची वाढ झाली, तर नोकरी बंद होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांनी वाढलं आहे. हे देखील वाचा: नवीन फोन येताच जुन्या स्मार्टफोनची किंमत घटली; स्वस्त झाला 108MP कॅमेरा आणि 8GB RAM असलेला फोन
5G येण्याआधी जोमात भरती
रिपोर्टनुसार रिलायन्स जियो ‘लीड 5 जी कोर आणि क्लाउड आर्किटेक्चर’ साठी भरती करत आहे, असे लोक जे 5 जीचा वापर आणि मुख्य प्रोडक्ट विकसित करण्यास मदत करतील. प्रमुख टेलीकॉम ऑपरेटर विआय देखील स्मार्ट मोबिलिटी वर्टिकल, 5जी कनेक्टेड कार्स आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनुभव असणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे.
Jio आणि Vi व्यतिरिक्त, टेक कंपन्या देखील नेटवर्क एडमिनिस्ट्रेशन, ट्रायल आणि सॉफ्टवेयर डेव्हलपर सारख्या विभागांमध्ये भरती करत आहेत. रिपोर्टनुसार जानेवारी 2022 ते जुलै 2022 दरम्यान 130 पेक्षा जास्त नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत
5G कधी होणार लाँच
आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार 5G सेवा 29 सप्टेंबर, 2022 ला लाँच केली जाईल. 29 सप्टेंबरला इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2022 चं उद्घाटन केलं जात आहे आणि या निमित्ताने भारतात 5G सेवा देखील जारी केली जाईल. वहीं, काही दिवसांपूर्वी केंद्रीय आयटी आणि टेलीकॉम मिनिस्टर Ashwini Vaishnaw यांनी म्हटलं होतं की, लवकरच कंपन्यांना 5G स्पेक्ट्रमचं वाटप केलं जाईल. सरकार ऑक्टोबरच्या सुरुवातीला लोंकांपर्यंत 5जी स्पीडचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जियो आणि एयरटेलनं या महिन्यात 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
















