कूलपॅड मेगा 5ए लॉन्च, फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल बेजल लेस डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 2जीबी रॅम

टेक कंपनी कूलपॅड ने एप्रिल मध्ये भारतात मेगा 4ए स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनी ने हा फोन फक्त आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर विकला होता. आता कंपनी ने आपली ही सीरीज पुढे नेत नवीन स्मार्टफोन मेगा 5ए लॉन्च केला आहे. कूलपॅड मेगा 4 5,999 रुपयांमध्ये मिळत होता तर मेगा 5ए को 6,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आधीच्या वर्जन प्रमाणे हा फोन आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरच विकण्यात येईल.

कूलपॅड मेगा 5ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मेगा 5ए एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच हा 1.3गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर प्रोसेसर सह स्प्रेडट्रम एससी9850के चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. मेगा 5ए 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 64जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड ने आपला हा फोन डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च केला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 8-मेगापिक्सल आणि 0.3-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

कूलपॅड मेगा 5ए डुअल सिम फोन आहे जो 4जी नेटवर्क वर इंटरनेट वापरु शकतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे जो फोन समोर चेहरा येताच फोन अनलॉक करतो. तसेच पावर बॅकअप साठी कूलपॅड ने आपल्या या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी दिली आहे. कूलपॅड मेगा 5ए आज पासून संपूर्ण देशात सेल साठी उपलब्ध होईल तसेच हा 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here