16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर

काही दिवसांपूर्वी 6जीबी रॅम आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह हुआवई च्या मेट स्मार्टफोन सीरीज चा आगामी स्मार्टफोन मेट 20 लाइट समोर आला होता. हा फोन समोर आल्यानंतर वाटले होते की कंपनी आईएफए 2018 च्या मंचावरून आपली आगामी स्मार्टफोन सीरीज सादर करेल आणि या सीरीज मध्ये मेट 20, मेट 20 लाइट आणि मेट 20 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पण झाले उलटेच, हुआवई ने आईएफए 2018 च्या प्लॅटफॉर्म वरून मेट 20 सीरीज लॉन्च न करता फक्त याची लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. हुआवई येत्या 16 ऑक्टोबरला मेट 20 सीरीज जगासमोर ठेवेल.

हुआवई ने घोषणा केली आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करेल आणि या ईवेंट मधून मेट 20 सीरीज समोर येईल. पण कंपनी ने लॉन्च डेट सोबत या सीरीज मध्ये कोण कोणते फोन असतील याची माहिती दिली नाही. परंतु आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हुआवई मेट सीरीज मध्ये मेट 20, मेट 20 लाइट आणि मेट 20 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल.

लीक्स नुसार हुआवई मेट 20 6.28-इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो तर मेट 20 प्रो मध्ये कर्व्ड ​डिस्प्ले सोबत रेगुलर नॉच ​दिली जाऊ शकते. तसेच मेट 20 लाइट 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशी पण चर्चा आहे की मेट 20 आणि मेट 20 प्रो च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच मेट 20 लाइट च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर दोन-दोन कॅमेरा सेंसर असतील.

हुआवई मेट 20 आणि मेट 20 प्रो मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल तसेच लीक्स नुसार तिन्ही मॉडेल्स च्या एका वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात येईल तसेच इंटरनल स्टोरेज 128जीबी ची असेल. हुआवई आपली मेट सीरीज एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड पाई सह सादर करू शकते तसेच प्रोसेसिंग साठी यात हुआवई चा लेटेस्ट चिपसेट किरीन 980 देण्यात येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here