9 ऑक्टोबरला लॉन्च होऊ शकतो गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल, एफसीसी वर झाले लिस्ट

गूगल च्या आगामी पिक्सल डिवाईस बद्दल कित्येक लीक्स समोर आले आहेत. गूगल पिक्सल 3एक्सएल चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता तर पिक्सल 3 चा रेंडर वीडियो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे. त्यात अशी चर्चा आहे की गूगल कंपनी येत्या 9 ऑक्टोबरला पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्मार्टफोन जगासमोर ठेवेल. आता गूगल चे हे दोन्ही डिवाईस एफसीसी वर पण लिस्ट झाले आहेत ज्यामुळे फोन च्या लॉन्च ची तारीख खरी असेल असे वाटते आहे.

गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल एफसीसी वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहेत. या वेबसाइट वर एक फोन ए4आरजी103ए मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर दुसरा फोन ए4आरजी103सी मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. बोलले जात आहे की हे दोन्ही मॉडेल गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल चे आहेत. टेक एक्सपर्ट्स चे म्हणेन आहे की गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या पिक्सल 2 च्या मॉडेल नंबर च्या शेवटी 011ए होते तसेच पिक्सल 2एक्सएल च्या मॉडेल नंबर च्या शेवटी डिजीट 011सी होते. म्हणजे ‘ए’ डिजीट वाला पिक्सल डिवाईस असेल आणि ‘सी’ डिजीट वाला पिक्सल एक्सएल असेल.

पिक्सल डिवाईसेज लिस्टिंग विशेष असण्याचे कारण म्हणजे पिक्सल आणि पिक्सल एक्सएल फर्स्ट जेनेरेशन ला एचटीसी कंपनी ने एफसीसी वर सब्मिट केले होते. तर पिक्सल 2 आणि पिक्सल 2एक्सएल एचटीसी व एलजी ने एक साथ एफसीसी मध्ये रजिस्टर केले होते. पण यावेळी पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्वतः गूगल ने एफसीसी वर रजिस्टर केले आहेत. त्यामुळे बोलले जात आहे की गूगल ने स्वतः आगामी पिक्सल डिवाईसेज डिजाईन केले असतील.

गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या समोर आलेल्या फोटोज वरून समजले आहे की हा फोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल जो 1440+ पिक्सल ला सपोर्ट करेल. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम चा असेल तसेच एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस वर्जन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या नॉच मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतो.

समोर आलेल्या फोन च्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन च्या खाली आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगलचा लोगो आहे. तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here