
चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo सध्या V-सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं Vivo V29 Lite 5G स्मार्टफोन गुगल प्ले कंसोल डेटाबेसवर मॉडेल नंबर V2244 सह लिस्ट केला आहे. यावरून समजलं आहे की हा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो. कंपनीनं सध्या अपकमिंग स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती शेयर केली नाही. लिस्टिंगमधून या फोनचा फ्रंट लुक आणि प्रोसेसरबाबत माहिती मिळाली आहे.
Vivo V29 Lite 5G गुगल प्ले कंसोल लिस्टिंग
- वॉटरड्रॉप नॉच आणि थिन बेजल
- Qualcomm Snapdragon 695 चिपसेट
गुगल प्ले कंसोल डेटाबेस लिस्टिंगवरून समजलं आहे की Vivo V29 Lite 5G स्मार्टफोन फुल HD+ डिस्प्लेसह सादर केला जाईल, ज्यात वॉटरड्रॉप नॉच आणि थिन बेजल मिळेल. तसेच फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट दिला जाईल, जो 2.2GHz स्पीडवर क्लॉक केला गेला आहे. हा फोन Adreno 619 ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (GPU) सह येईल.
गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमधून आगामी Vivo V29 Lite 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार हा फोन Android 13 वर चालेल.
लिस्टिंगनुसार Vivo V29 Lite 5G स्मार्टफोनचा मॉडेल नंबर V2244 आहे. या मॉडेल नंबरसह Vivo Y78 स्मार्टफोन Google Play आणि 3C वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे Vivo V29 Lite 5G आणि Vivo Y78 5G स्मार्टफोन वेगवेगळ्या मार्केटमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
Vivo V29 Lite 5G स्मार्टफोन Vivo Y78 5G चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं सध्या आगामी स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती ऑफिशियल केली नाही.















