
रिलायन्स जियोनं 4जी फोन ‘जियो भारत V2’ लाँच केला आहे. जियो भारत V2 कंपनीनं 999 रुपयांमध्ये सादर केला आहे. ह्या फोनच्या माध्यमातून कंपनी भारतातील 25 कोटी 2जी ग्राहकांना लक्ष्य करत आहे. हे ग्राहक आता एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया सारख्या कंपन्यांकडे आहेत. तसेच रिलायन्स जियोचा दावा आहे की ‘जियो भारत V2’ च्या जीवावर कंपनी 10 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडेल.
Jio Bharat V2 सह लाँच झाला रिचार्ज प्लॅन
999 रुपयांमध्ये आलेल्या ‘जियो भारत V2’ सह एक मंथली रिचार्ज देखील सादर करण्यात आला आहे. हा प्लॅन कंपनीनं 123 रुपयांमध्ये आणला आहे. प्लॅनमध्ये ‘जियो भारत V2’ च्या ग्राहकांना कंपनी 14 जीबी 4जी डेटा मिळेल. तसेच ‘जियो भारत V2’ वर वार्षिक प्लॅन देखील आहे ज्यासाठी ग्राहकांना 1234 रुपये द्यावे लागतील.
Jio Bharat V2 ची खासियत
- ‘जियो भारत V2’ 4G वर चालतो, यात एचडी व्हॉइस कॉलिंग आणि एफएम रेडियो आहे.
- तसेच फोनमध्ये 128 जीबी एसडी मेमरी कार्ड सपोर्ट सारखे फीचर्स आहेत.
- मोबाइलमध्ये 1.77 इंचाची टीएफटी स्क्रीन आणि 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
- तसेच फोनमध्ये 1000 mAh ची बॅटरी, 3.5 mm चा हेडफोन जॅक, पावरफुल लाउडस्पिकर आणि टार्च देण्यात आली आहे.
Jio Bharat V2 मोबाइल ग्राहकांना जियो सिनेमा सब्सक्रिप्शनसह जियो-सावनच्या 8 कोटी गाण्यांचा अॅक्सेस मिळेल. ग्राहक जियो-पेच्या माध्यमातून यूपीआयवर देवाण घेवाण करू शकतात. भारतातील प्रमुख भाषा ‘जियो भारत V2’ मध्ये आहेत. हा मोबाइल 22 भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.
Jio Bharat V2 ची उपलब्धता
कंपनीनं 7 जुलैपासून ‘जियो भारत V2’ च्या बीटा ट्रायलची घोषणा केली आहे. कंपनीचा प्लॅन ‘जियो भारत V2’ 6,500 तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचा आहे. जियोफोन प्रमाणेच ‘जियो भारत V2’ कडून कंपनीला खूप अपेक्षा आहेत.














