8GB रॅम, 6,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा असलेला स्वस्त फोन चीनमध्ये लाँच, जाणून घ्या किंमत

Highlights

  • Huawei Enjoy 70 चीनमध्ये सादर झाला आहे.
  • ह्यात 6.75 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे.
  • हा किरिन 710 ए चिपसेटसह आहे.


मोबाइल निर्माता Huawei ने घरेलू बाजार चीनमध्ये नवीन बजेट फोन Huawei Enjoy 70 लाँच केले आहे. हा फोन कमी किंमतीत यूनिक डिजाइनसह 8GB रॅम, 6000mAh बॅटरी, 6.75 इंचाचा मोठा डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा सारखे अनेक फिचर्स प्रदान करतो. चला, पुढे तुम्हाला याचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती देत आहोत.

Huawei Enjoy 70 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Huawei Enjoy 70 मध्ये युजर्सना टियरड्रॉप नॉच असलेला एचडी + एलसीडी पॅनल मिळेल. यात 6.75 इंच स्क्रीन 720 x 1600 पिक्सल रिजॉल्यूशन देण्यात आले आहे. डिव्हाइसवर युजर्सना सामान्य 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: एन्जॉय 70 किरिन 710ए चिपसेटसह देण्यात आला आहे. हा जास्त पावरफुल नाही, परतुं यामध्ये चांगला एंट्री लेव्हल परफॉरमेंस मिळतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज प्रदान करतो.
  • बॅटरी: एन्जॉय 70 मध्ये 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • कॅमेरा: Huawei Enjoy 70 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आला आहे.
  • अन्य: सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी-सी पोर्ट सारखे अनेक फिचर्स मिळत आहेत. तसेच फोनमध्ये एक फिजिकल “एन्जॉय एक्स” बटन पण आहे, ज्यामुळे जास्त वापर होणारे कोणतेही 9 अ‍ॅप्स दिसणार आहे.
  • ओएस: Huawei Enjoy 70 मोबाइल हार्मनी ओएस 4 सह येतो.

Huawei Enjoy 70 ची किंमत

  • Huawei Enjoy 70 ब्रँडने फोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे.
  • फोनची 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज 1,199 युआन म्हणजे 14,154 रुपयांचा आहे.
  • तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मॉडेल 1,399 युआन म्हणजे 16,454 रुपयांना मिळेल.
  • मोबाइलसाठी ब्रिलियंट ब्लॅक, स्नोई व्हाइट आणि एमराल्ड ग्रीन सारखे तीन कलर लाँच झाले आहेत.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here