
Huawei ने आपल्या एंजॉय 70 सीरीज अंतगर्त गेल्या महिन्यात एंजॉय 70 लाँच केला होता तसेच, आता कंपनी याचा प्रो व्हेरिएंट Huawei Enjoy 70 Pro घेऊन आला आहे. या फोनमध्ये युजर्सना 6.7 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 108 मेगापिक्सल प्रायमरी रिअर कॅमेरा, 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज सारखे अनेक फिचर्स दिले गेले आहेत. चला, पुढे फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती जाणून घेऊया.
Huawei Enjoy 70 Pro चे स्पेसिफिकेशन्स
- डिजाइन: कंपनीने एंजॉय 70 प्रो मोबाइलमध्ये रिंग कॅमेरा मॉड्यूल दिले आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि मॅट फिनिश देण्यात आले आहे. हा तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे.
- डिस्प्ले: Huawei Enjoy 70 Pro मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळतो. कंपनीचा दावा आहे की हा ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यामुळे स्क्रीन चालू न करता नोटिफिकेशन बघू शकता.
- प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 680 4G चिपसेट लावला आहे. हा चिपसेट 2.4GHz हाई क्लॉक स्पीडवर चालतो.
- स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये 8GB रॅम आणि 256जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स मिळतो.
- बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोन 5000mAh बॅटरी आणि 40 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येतो.
- ऑपरेटिंग सिस्टम: ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन HarmonyOS वर चालतो.
- अन्य: Huawei Enjoy 70 Pro मध्ये वायफाय, ब्लूटूथ 5, टाइप सी पोर्ट, ड्युअल सिम 4 जी सारखे ऑप्शन आहेत.
Huawei Enjoy 70 Pro ची किंमत
- Huawei Enjoy 70 Pro ब्रँड ने दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये चीनमध्ये सादर केला आहे.
- फोनच्या 8 जीबी रॅम +128 स्टोरेजची किंमत 1,449 युआन म्हणजे 17,208 रुपये आहे.
- मोबाइलचा 8 जीबी रॅम +256 स्टोरेज मॉडेल 1,649 युआन जवळपास 19,583 रुपयांचा आहे.
- कलर ऑप्शन पाहता हा ओब्सीडियन ब्लॅक, स्नोई व्हाइट आणि एमराल्ड ग्रीन सारखे तीन कलरमध्ये लाँच झाला आहे.














