Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी येत आहे Mahindra ची इलेक्ट्रिक कार; लाँचचा मुहूर्त ठरला

महिंद्रा अँड महिंद्रानं 15 ऑगस्टला आपल्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहेत. गेले अनेक दिवस Mahindra ची इलेक्ट्रिक मोबिलिटी डिवीजन Mahindra XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV वर काम करत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी पुढील महिन्यात ही Electric Car लाँच करणार आहे. ताज्या रिपोर्टनुसार, महिंद्रा 6 सप्टेंबर 2022 ला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या लाँचसाठी एका इव्हेंटचं आयोजन करणार आहे. बोलले जात आहे की हे eXUV 300 चे प्रोडक्शन-स्पेक व्हर्जन आहे जे ऑटो एक्सपो 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं आणि ही महिंद्रा XUV300 वर आधारित आहे.

Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत, फीचर्स

Mahindra XUV400 काही दिवसांपूर्वी टेस्टिंग दरम्यान रस्त्यावर दिसली होती. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार Mahindra XUV400 कार 6 सप्टेंबर 2022 ला लाँच केली जाईल. लाँच झाल्यावर ही Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX ला टक्कर देईल. Mahindra XUV400 EV ची किंमत 15 ते 18 लाख रुपये (सबसिडीपूर्वी एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. हे देखील वाचा: OLA S1 पेक्षा कमी किंमतीत लाँच झाली 120 किलोमीटर रेंज असलेली Electric Scooter; फीचर्स दर्जेदार

XUV400 मोठ्या प्रमाणावर SsangYong Tivoli वर आधारित असेल, जी XUV300 ICE-संचालित SUV आधारित आहे. त्यामुळे XUV400 XUV300 पेक्षा जास्त लांब असेल आणि हिची लांबी जवळपास 4.2m असण्याची शक्यता आहे. कॉस्मेटिक्स च्या बाबतीत XUV400 Tivoli आणि XUV300 दोन्ही वेगळ्या असतील. XUV400 मध्ये ब्लँंक्ड-आउट ग्रिल, कंटूरेड फ्रंट बंपर आणि त्रिकोनी फॉग लॅम्प हाउसिंग मिळण्याची शक्यता आहे.

हेडलॅम्प क्लस्टर देखील नव्यानं तयार करण्यात आलं आहे. मागे XUV400 मध्ये एलईडीसह रॅप-अराउंड टेल लॅम्पच्या एका जोडीसह एक नवीन डिजाइन असलेला टेलगेट मिळेल. साइड प्रोफाईलला नवीन अलॉय व्हील्स मिळतील आणि XUV400 मध्ये 17-इंचाचा मोठा अलॉय एक सेट मिळू शकतो. हे देखील वाचा: Mahindra लाँच करणार 5 दमदार इलेक्ट्रिक कार; पाहा यांची डिजाइन आणि लाँच डेट

XUV400 मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर असेल जी पुढील चाकांना चालवेल आणि जवळपास 150bhp ची पीक पावर देईल. बॅटरी क्षमतेसाठी दोन पर्याय असतील. XUV400 मध्ये एक अपग्रेडेड इंफोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे आणि यात ADAS फंक्शंससह लेटेस्ट ADRENOX प्लॅटफॉर्म देखील मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here