
नथिंग फोन (2ए) (Nothing Phone (2a) काही दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे, कारण त्याचे लीक केलेले रेंडर बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. फोनला भारतात 5 मार्च, 2024 ला लाँच केले जाईल. नथिंगचा हा फोन Nothing Phone (2) च्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता आहे. आता एका नवीन लीकमध्ये नथिंग फोन (2ए) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया याची माहिती…
Nothing Phone (2a) स्पेसिफिकेशन झाले लीक
- नथिंग फोन (2ए) चे स्पेसिफिकेशन टिपस्टर योगेश बरार नं लीक केले आहे आणि याची माहिती एक्स (ट्विटर) वर शेअर केली आहे.
- लीकच्यानुसार, नथिंग फोन (2a) मध्ये 6.7-इंच FHD+ OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे.
- स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 अल्ट्रा प्रोसेसरसह येईल.
- कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, नथिंग फोन (2a) मध्ये मागील बाजूस 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असेल. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
- सॉफ्टवेअर मध्ये संभवतः अँड्रॉइड 14 वर आधारित नथिंग ओएस 2.5 वर चालेल.
- स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येणार असल्याची पण माहिती आहे.
Nothing Phone (2a) ची किंमत (लीक)
लीकच्या नुसार, नथिंग फोन (2ए) ची भारतात किंमत जवळपास 30,000 रुपये असू शकते. यामुळे हा डिव्हाइस फ्लॅगशिप नथिंग फोन (2) जवळपास 6,000 रुपये स्वस्त असेल. सध्या नथिंग फोन 2 ची किंमत भारतात 36,000 रुपयांपासून सुरु होते. नथिंग युट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये को-फाउंडर कार्ल पेई नं संकेत दिला आहे की फोन (2ए) फोन (2) पेक्षा स्वस्त असेल. नथिंग फोन (1) ला 2022 मध्ये 32,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले गेले होते.
नथिंग फोन (2ए) ची डिजाइन पण खूप यूनिक असणार आहे. अधिकृतपणे संभावित डिजाइन स्केचच्या सेंटरमध्ये असलेला रिअर कॅमेरा मॉड्यूल आणि डिजाइन शेअर करण्यात आले आहेत आणि ग्लिफ इंटरफेस दाखवण्यात आला आहे. नथिंग फोन (2ए) ला पारदर्शी डिजाइन सोबत सादर केले जाईल.
नथिंग फोन 2ए स्पेसिफिकेशन्स (लीक)
नथिंग फोन 2ए बाबतची माहिती आतापर्यंत समोर आली आहे, यानुसार फोनचे स्पेसिफिकेशन्स काही असे असू शकतात.
- डिस्प्ले: नथिंग फोन (2a) मध्ये 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.
- प्रोसेसर: फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 चिपसेटसह येणार असल्याची अपेक्षा आहे.
- रॅम आणि स्टोरेज: स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज विकल्प असू शकतो.
- कॅमेरा: स्मार्टफोनमध्ये 50MP सॅमसंग ISOCELL S5KGN9 प्रायमरी कॅमेरा, 50MP ISOCELL JN1 अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि सेल्फीसाठी 32MP Sony IMX615 फ्रंट कॅमेरा असू शकतो.
- ओएस: नथिंग फोन (2ए) अँड्रॉइड 14 आधारित नथिंगओएस 2.5 वर येऊ शकतो.
- बॅटरी: फोनमध्ये 4,290mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असण्याची अपेक्षा केली जात आहे.
- कलर: नथिंग फोन (2ए) ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये येऊ शकतो.














