Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट

Realme ला भारतात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात कंपनीने भारतात मोठा फॅन बेस बनवला आहे. Realme ने असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे लो बजेट मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतात. रियलमी द्वारा लॉन्च केले गेलेले जवळपास सर्व स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सना आवडले आहेत. आपल्या फॅन्स साठी Realme पण वेळोवेळी नवीन ऑफर्सची सुरवात करत असते. त्यानुसार कंपनीने आता आपल्या फॅन्स साठी Realme Leap Days सुरवात केली आहे ज्या अंतर्गत ब्रँडचे हिट स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह स्वस्तात विकले जात आहेत.

अशी आहे ऑफर

Realme Leap Days कंपनी द्वारा 4 दिवसांसाठी आयोजित केला गेला आहे. हा खास प्रकारचा सेल आज म्हणजे 27 जून पासून सुरु झाला आहे जो 30 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये ब्रँडचे 7 स्मार्टफोन वेरिएंट्स कमी किंमतीत विकले जातील. Realme चे स्वस्त स्मार्टफोन्स अजून स्वस्तात विकत घेता येतील आणि मोबाईल फोन वर 1,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. Realme Leap Days मध्ये कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

हे फोन मिळतील स्वस्त

Realme U1 बद्दल सर्वात आधी बोलायचे झाले तर कंपनी आपल्या या स्मार्टफोन वर थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर Realme Leap Days अंतर्गत हा वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 10,499 रुपयांचा 3जीबी + 64जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळेल आणि 9,999 रुपयांमध्ये येणारा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लो बजेट सेग्मेंट मधेच लॉन्च झालेल्या Realme C1 ची किंमत पण Realme Leap Days मध्ये कंपनीने 1500 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Realme C1 चा 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

Realme Leap Days मध्ये कंपनीने Realme 2 Pro ची किंमत पण कमी केली आहे. सेल मध्ये फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विकला जात. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 6जीबी रॅम मेमरी वाल्या वेरिएंट वर कंपनी 500 रुपयांची सूट देतआहे. 12,990 रुपयांचा हा फोन 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 2 स्मार्टफोन पण कंपनीच्या Realme Leap Days सेल मध्ये आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 500 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्टफोन आधी 9,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता Realme सेल मध्ये हा स्मार्टफोन वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कपंनी फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट जुन्याच किंमतीती विकत आहे जी 10,990 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here