सॅमसंगने भारतात Galaxy F15 5G स्मार्टफोनच्या लाँचला टीज करणे सुरु केले आहे. टीजर आता फ्लिपकार्ट अॅपवर “Coming Soon” मेसेज सोबत लाइव्ह केले आहे. आता अपेक्षा की आहे की कंपनी लवकरच या डिवाइसची ऑफिशियल लाँचची तारीख कधी आहे याचा खुलासा करू शकते. तसेच, याव्यतिरिक्त Galaxy F15 5G प्रोमो पोस्टर समोर आले आहेत, ज्यात डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच, लीकच्या माध्यमातून डिवाइसची तारीख पण समोर आली आहे.
Galaxy F15 लाँच तारीख (लीक)
smartprix च्या रिपोर्ट्सनुसार Samsung Galaxy F15 या महिन्यात 22 फेब्रुवारीला भारतात लाँच केला जाईल. तसेच, हे कन्फर्म आहे की लाँचनंतर फोनची सेल ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्टवर केली जाईल.
Galaxy F15 प्रोमो पोस्टर लीक
स्मार्टप्रिक्स द्वारे अलीकडेच शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी F15 च्या काही स्पेक्सची पण माहिती मिळत आहे. फोनमध्ये क्लासिक सॅमसंग डिजाइन असेल, अपेक्षा आहे की हा मीडियाटेक डायमेंशन 6100+ सह येईल, ज्यामुळे हा डायमेंशन 720 चिपसेटसह गॅलेक्सी ए15 पेक्षा पण फास्ट फोन बनेल.
गॅलेक्सी F15 6000 एमएएचची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह येईल, ज्यात USB-C चार्जिंग पोर्ट असेल. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, परंतु स्मार्टप्रिक्सने कॅमेरा स्पेक्स का खुलासा केलेला नाही, या कॅमेरा सेटअपमध्ये एक वाइड-अँगल कॅमेरा, एक अल्ट्रावाइड-अँगल कॅमेरा आणि एक मॅक्रो कॅमेरा असण्याची संभावना आहे.
गॅलेक्सी F15 ला 2027 पर्यंत अपडेट मिळण्याची शक्यता आहे, तसेच सोबत पाच वर्षांसाठी सुरक्षा पॅच अपडेट पण मिळेल. ही S24 सीरीज एवढी चांगली नाही, परतुं एका एंट्री लेव्हल डिवाइससाठी 4 वर्षाचा सॉफ्टवेयर अपडेट मिळणे खूप चांगली बातमी आहे.
काय असू शकते किंमत (अनुमानित)
किंमतीच्या माहितीची अजून पण पुष्टी झालेली नाही, परतुं आम्ही सहज सांगू शकतो की सॅमसंगचा नवीन एंट्री-लेव्हल डिवाइस बजेटममध्ये येईल.
Samsung Galaxy F15 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- डिस्प्ले: सध्या Samsung Galaxy F15 5G च्या डिस्प्ले साइजचा खुलासा झालेला नाही परतुं सांगण्यात आले आहे की हा अॅमोलेड स्क्रीन आणि वॉटर ड्रॉप नॉच डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो.
- प्रोसेसर: फोनच्या प्रोसेसर पाहता गीकबेंच लिस्टिंगनुसार हा मीडियाटेक डाइमेंसिटी 6100 प्लस चिपसेटसह सादर असू शकतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू मिळण्याची माहिती देण्यात आली आहे.
- स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाइसमध्ये 4GB रॅम बेस मॉडेल लाँच होऊ शकतो. तर 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज असणारे आणखी मॉडेल पण आणले जाऊ शकतात.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता हा मोबाइल ब्रँडच्या जुन्या पॅटर्नला फॉलो करत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते.
- बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F15 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.














