iQOO Z9 Turbo 24 एप्रिलला Snapdragon 8s Gen 3 आणि 6,000mAh Battery सह होईल लाँच

iQOO Z9 5G फोन भारतीय बाजारात 19,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर पावरसह या स्मार्टफोन चे ‘टर्बो’ मॉडेल पण आता मार्केटमध्ये येण्याची तयारी करत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ते आपला नवीन मोबाईल फोन iQOO Z9 Turbo 24 एप्रिलला चीनमध्ये लाँच करतील.

iQOO Z9 Turbo लाँचची माहिती

आयकू झेड 9 टर्बो 24 एप्रिलला टेक मंचावर सादर केले जाईल. या दिवशी हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच होईल. ​आतापर्यंत या मोबाईलला भारतात लाँच केले जाणार असल्याची माहिती समोर आली नाही. चीनमध्ये लाँच होणारा iQOO Z9 Turbo भारतीय बाजारात iQOO Z9 5G चे फिचर्स व स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत वेगळा आणि पावरफुल असेल. फोनचे लीक झालेले स्पेसिफिकेशन तुम्ही पुढे वाचू शकता.

iQOO Z9 Turbo चा प्रोसेसर

कंपनीकडून ऑफिशियल करण्यात आले आहे की आयकू झेड 9 टर्बो स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेटवर लाँच होईल. तसेच हा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 1x 3.0GHz (Cortex-X4) + 4x 2.8GHz (Cortex-A720) + 3x 2.0GHz (Cortex-A520) असणाऱ्या Octa-core Kryo CPU वर चालते.

iQOO Z9 Turbo स्पेसिफिकेशन

  • 6,000mAh Battery
  • 120W fast charging
  • 50MP OIS Camera
  • 6.78″ 1.5K OLED Screen
  • 16GB RAM + 1TB Storage

स्क्रीन : आयकू झेड9 टर्बोला 1.5K रिजोल्यूशन असणारी 6.78″ OLED स्क्रीन सादर केली जाऊ शकते. हा डिस्प्ले 144Hz refresh rate आणि 2160Hz PWM dimming सह in-screen fingerprint scanner सह असू शकतो.

ओएस : लीकनुसार iQOO Z9 Turbo ला लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम Android 14 सह बाजारात आणले जाऊ शकते ज्यावर OriginOS 4 ची लेयर पाहायला मिळू शकते.

मेमरी : हा आयकू स्मार्टफोन 16GB LPDDR5x RAM वर लाँच केला जाऊ शकतो ज्यासोबत 1TB UFS 4.0 Storage दिली जाऊ शकते. हा मोबाईलचा सर्वात मोठा व्हेरिएंट असू शकतो.

बॅटरी : कंपनीकडून सांगण्यात आले आहे की आयकू झेड 9 टर्बो 6,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच लीकनुसार हा 120 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आणला जाऊ शकतो. तसेच फास्ट चार्जिंगमुळे याला ‘टर्बो’ नाव देण्यात आले आहे.

कॅमेरा : आयकू झेड 9 टर्बोमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 50-megapixel मेन कॅमेरा सेन्सर सामिल असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here