11 मार्चला लाँच होणार Samsung Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G, ब्रँडने केले कंफर्म

Highlights

  • ब्रँडने अधिकृतपणे फोनला टीज केले आहे.
  • हा 11 मार्चला भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे.
  • दोन्ही मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल.


स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगच्या दोन ए-सीरीज स्मार्टफोन काही महिन्यापासून लीक आणि सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर येत होता. तसेच, आता याचे लाँच 11 मार्चला कंफर्म झाले आहे. हा Samsung Galaxy A55 5G आणि Samsung Galaxy A35 5G नावाने भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. तसेच ब्रँडने अधिकृत घोषणा करत फोनला टीज केले आहे, तर कंपनी वेबसाईटवर लाँचची तारिख शेअर करण्यात आली आहे. चला, पुढे तुम्हाला मोबाईलची माहिती जाणून घेऊया.

Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G च्या लाँचची तारीख

  • सॅमसंगनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दोन्ही मोबाईलचा टीजर व्हिडिओ सादर केला आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की सॅमसंगनं Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G स्मार्टफोनची पहली झलक दिसली आहे.
  • लाँच टीजरमध्ये मोबाईल सादर होण्याची तारीख आलेली नाही, परंतु अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर 11 मार्च दुपारी 2:30 वाजताची वेळ पाहायला मिळत आहे.

Samsung Galaxy A35 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Galaxy A35 5G मध्ये 6.6 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. यावर FHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,650निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: रिपोर्टनुसार गॅलेक्सी A35 5G Exynos 1380 5 नॅनो मीटर प्रक्रियावर आधारित चिपसेटसह असू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत मोबाईलमध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी असणार आहे ज्याला चार्ज करण्यासाठी 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात HDR व्हिडिओ सपोर्टसह 50MP चा OIS प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड आणि 5MP ची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तसेच, सेल्फीसाठी 13MP ची लेन्स लावली जाऊ शकते.

Samsung Galaxy A55 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy A55 5G मध्ये मोठा 6.6 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर FHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, आणि 1,650 निट्स पीक ब्राइटनेस मिळू शकते.
  • प्रोसेसर: गॅलेक्सी ए55 5G Exynos 1480 4 नॅनो मीटर प्रक्रियावर आधारित चिपसेट असू शकते.
  • स्टोरेज: या मोबाईलमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • बॅटरी: फोनमध्ये युजर्सना 5000 एमएएचची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा: या नवीन सॅमसंग मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात OIS सह 50MP चा प्रायमरी, 12MP अल्ट्रावाइड आणि 5MP चा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो तर सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा लावला जाऊ शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here