एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास

रियलमी ब्रँडचे नाव त्या स्मार्टफोन कंपन्यांमध्ये येते ज्यांनी थोड्याच कालावधीत निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर मोठे यश मिळवले आहे. Realme ब्रँड सुरु होऊन एक वर्ष झाले आहे. Realme 1 पासून या एका वर्षाची सुरवात करणाऱ्या कंपनी ने आज भारतीय बाजारात आपला लेटेस्ट डिवाईस Realme 3 Pro लॉन्च केला आहे. Realme 3 Pro कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे जे 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमला सपोर्ट करतात. पण आपल्या फॅन्ससाठी कंपनी हा डिवाईस लवकरच अजून पावरफुल करेल. रियलमी कंपनी Realme 3 Pro चा 8जीबी रॅम असलेला दमदार वेरिएंट पण लॉन्च करेल.

रियलमीने आज Realme 3 Pro भारतीय बाजारात आणला आहे. फोनच्या लॉन्च ईवेंट मध्ये ब्रँडचे सीईओ माधव सेठ बोलताना सांगितले कि कंपनी Realme 3 Pro चा अजून एक नवीन रॅम वेरिएंट लॉन्च करण्याची योजना पण करत आहे. या वेरिएंट मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम दिला जाईल. माधव सेठ नुसार Realme 3 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट कंपनी महाग बजेट मध्ये लॉन्च करणार नाही तर या आगामी वेरिएंटची किंमत 18,000 रुपयांच्या आसपास असेल.

माधव सेठ सोबत असे पण सांगितले कि सध्या काही काळ कंपनी Realme 3 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट लॉन्च करणार नाही. फोनचा हा रॅम वेरिएंट जुलै-ऑगस्ट मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे 8जीबी रॅम Realme 3 Pro जर या प्राइज सेग्मेंट मध्ये आला तर हा फोन फक्त देशातील सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाल्या फोन्सच्या लिस्ट मध्ये समाविष्ट होणार नाही तर शाओमी व सॅमसंग सारख्या प्रतिस्पर्धी ब्रँड्सना पण टक्कर देईल.

हे देखील वाचा: फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Infinix Smart 3 Plus

रियलमी इंडिया सीईओ ने ब्रँडची स्ट्रॅटर्जी शेयर करत असे सांगितले कि रियलमी भारतात आपल्या ऍक्सेसरीज आणण्याची तयारी पण करत आहे आणि यावर्षी दिवाळीच्या आधी कंपनी देशात रियलमीच्या एक्सेसरीज लॉन्च करेल. या एक्सेसरीज मध्ये पावरबॅंक सारख्या डिवाईसचा समावेश असेल. माधव सेठ यांनी आपल्या विधानात असे पण म्हटले कि कंपनी आपल्या यूजर्सची गरज आणि मार्केट डिमांड लक्षात ठेऊन एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करते.

आज लॉन्च झालेल्या रियलमीच्या शानदार स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे तर कंपनीने Realme 3 Pro सोबत Realme C2 पण भारतात लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केले गेले आहेत. Realme 3 Pro 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme C2 कंपनी ने 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च केला आहे.

हे देखील वाचा:Jio 4जी डाउनलोड स्पीड मध्ये पुन्हा अव्वल, बघा दुसऱ्या कंपन्यांची हालत

रियलमी ने Realme 3 Pro चा 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच Realme C2 चा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. विशेष म्हणजे Realme 3 Pro चा पहिला सेल 29 एप्रिलला होईल तर Realme C2 साठी 15 मे ची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here