32MP Selfie Camera सह येईल Samsung Galaxy A55 5G! Exynos 1480 ची पण माहिती झाली लीक

Samsung Galaxy A55 5G फोन 11 मार्चला भारतात लाँच होईल. या मोबाईल सोबतच कंपनी Samsung Galaxy A35 5G ला पण भारतीय बाजारात आणणार आहे. कंपनीने आपल्या अपकमिंग स्मार्टफोनला टीज करणे सुरू केले आहे, परंतु सध्या याचे स्पेसिफिकेशन पडद्यामध्ये आहेत. तसेच आता भारतातील लाँचच्या आधी सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी चे संपूर्ण स्पेसिफिकेशन लीक बेल्जियम शॉपिंग साईटवर समोर आले आहेत ज्या तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A55 Specifications (लीक)

  • Samsung Exynos 1480
  • 12GB RAM + 128GB Storage
  • 6.6″ FHD+ OLED Display
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery
  • स्क्रीन: सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनबद्दल सांगण्यात आले आहे ​कि यात 6.6 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनला आहे यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी ए55 5जी फोनमध्ये सॅमसंगचा एक्सीनोस 1480 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे जो 2.7 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.
  • मेमरी: सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला एकापेक्षा अधिक मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार फोनचे सर्वात मोठे मॉडेल 12 जीबी रॅमवर येईल. तसेच फोनमध्ये 2टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड लावण्यात आले आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढण्यासाठी तसेच रिल्स बनविण्यासाठी Samsung Galaxy A55 5G फोनला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह मार्केटमध्ये आणले जाऊ शकते.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन सेन्सर, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले आहे. तसेच मोठ्या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी यात 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here