ऐश्वर्या रॉय बच्चनचा Ponniyin Selvan (PS1) लवकरच होणार या OTT वर रिलीज, जाणून घ्या तारीख

ponniyin-selvan-ps1-ott-release-date-cast-box-office-collection

Ponniyin Selvan (PS1) OTT Release Date: प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक Mani Ratnam यांचा चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन’ (Ponniyin Selvan) PS1 मध्ये ऐश्वर्याला बघण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक झाले होते. हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज झाला आणि याने प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपट गेली 10 दिवस थिएटरमध्ये आहे. तामिळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाल्यामुळे याची लोकप्रियता देखील जास्त आहे. आता हा चित्रपट OTT वर धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. ज्याची तारीख आणि अन्य माहिती आम्ही तुम्हाला पुढे दिली आहे.

Ponniyin Selvan OTT Release

चित्रपट मोठ्या पडद्यावर अनेकांच्या पसंतीला उतरला आहे. तर या चित्रपटाचे पोस्ट थीएट्रिकल डिजिटल अधिकार Amazon Prime Video कडे आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर दोन भागांमध्ये होणार होता. यातील पहिला प्रीमियर 30 सप्टेंबर 2022 ला चित्रपट गुहांमध्ये झाला आहे. तर दुसरा आता डिजिटल प्रेक्षकांसाठी ऑक्टोबर 2022 च्या शेवटपर्यंत OTT वर रिलीज केला जाऊ शकतो. याची तारीख ठरली नाही, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार Ponniyin Selvan OTT वर येण्यासाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा देखील उजडू शकतो.

Ponniyin Selvan (PS1) Box Office Collection

हा तामिळ चित्रपट लेखक आणि अ‍ॅक्टिव्हिस्ट Kalki Krishnamoorthy यांच्या कादंबरीवर आधारित आहे, जी त्यांनी 1995 मध्ये लिहिली होती. यात भारतातील एक प्रसिद्ध राजा चोल यांची काल्पनिक कहानी आहे. हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं मणी रत्नम यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत के बॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, रविवारपर्यंत सुमारे 400 कोटींचा वर्ल्ड वाइड गल्ला कमावण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे.

Ponniyin Selvan (PS1) Cast

या चित्रपटात मुख्य भूमिका Aishwarya Rai Bachchan म्हणजे नंदिनी / मंदाकिनी देवीची आहे. चित्रपटाची गोष्ट देखील या पात्राच्या अवतीभवती फिरते. विशेष म्हणजे ऐश्वर्याची दुहेरी भूमिका यात आहे, कारण ऐश्वर्याच राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवीची भूमिका साकारत आहे. तसेच मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य स्टार Vikram देखील आहे, जो आदित्य करिकालनची भूमिका करत आहे, Jayam Ravi देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. Karthi योद्धा राजकुमार वल्लवरैयन वंदियादेवनची भूमिका साकारत आहे. तर Trisha छोला राजकुमारी कुंडवई पिरतियारच्या भूमिकेत आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here