सॅमसंगने घोषणा केली आहे की भारतीय बाजारात ए-सीरीजचे स्मार्टफोन 11 मार्चला लाँच होणार आहे. यात युजर्सना Samsung Galaxy A35 5G आणि Samsung Galaxy A55 5G सारखे दोन मोबाईल पाहायला मिळतील. परंतु अजून लाँचमध्ये काही दिवसांची वेळ आहे, याआधी ही डिव्हाईसचे काही प्रमोशनल फोटो टिपस्टर द्वारे लीक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रमुख स्पेसिफिकेशन पण समोर आले आहेत. चला, पुढे जाणून घेऊया की फोन कसा लूक देईल.
Samsung Galaxy A35 5G ची डिझाईन
- तुम्ही खाली दिलेल्या फोटो गॅलरीमध्ये पाहू शकता की Samsung Galaxy A35 5G मध्ये ब्रँडने आपल्या जुन्या मोबाईलची डिझाईन फॉलो करण्यात आली आहे.
- लुकच्या बाबतीत हा खूप प्रीमियम दिसून येत आहे. डिव्हाईसला चार कलर ऑप्शनमध्ये दाखविण्यात आले आहे.
- स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एक एलइडी फ्लॅश आहे. तर उजव्या साईडवर पावर आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहे. तसेच, खालच्या बाजूला सॅमसंगची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
- फोनच्या समोरच्या बाजूला पातळ बेजेलसह प्लेट डिस्प्ले आणि पंच होल डिझाईन देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy A35 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले
- 120Hz रिफ्रेश रेट
- Exynos 1380 चिपसेट
- 8GB RAM+ 256GB स्टोरेज
- 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा
- 5000mAh बॅटरी
- अँड्रॉईड 14
- डिस्प्ले: Galaxy A35 5G मध्ये 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असू शकतो. यात FHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, आणि 1,650 निट्स पीक ब्राइटनेस मिळण्याची शक्यता आहे.
- प्रोसेसर: रिपोर्टनुसार Samsung Galaxy A35 5G मध्ये Exynos 1380 5 नॅनोमीटर प्रक्रियावर आधारित चिपसेट सादर केली जाऊ शकते.
- स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत मोबाईल दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये येऊ शकतो ज्यात 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB व्हेरिएंट असू शकतात.
- बॅटरी: फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. ज्याला चार्ज करण्यासाठी 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे फोटोमध्ये समोर आले आहे. ज्यात HDR व्हिडिओला सपोर्टसह 50MP चा OIS प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड आणि 5MP मॅक्रो लेन्स असू शकतात. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा लेन्स लावला जाऊ शकतो.
- ऑपरेटिंग सिस्टम: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा मोबाईल अँड्रॉइड 14 वर आधारित ठेवला जावू शकतो. त्याचबरोबर ब्रँड 4 वर्षाच्या OS अपग्रेड आणि 5 वर्षाचा सुरक्षा अपडेट प्रदान करू शकतो.













