Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती

Highlights

  • Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लवकरच भारतात येतील.
  • दोन्ही स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसले आहेत.
  • कंपनीनं या दोन्ही हँडसेटच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच भारतासह जगभरात Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अजूनही या हॅंडसेट्सच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली नाही, परंतु हे फोन्स अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसले आहेत, तसेच लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. आता प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानं इशारा दिला आहे की लवकरच हे स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात देखील लाँच केले जातील.

Redmi 12C आणि Redmi Note 12 4G भारतीय लाँच

टिपस्टर मुकुल शर्मानं ट्विट केलं आहे की Redmi 12C आणि Redmi Note 12 4G लवकरच जागतिक बाजारात आणि भारतात लाँच केले जातील. मुकुलनं अचूक अशी तारीख मात्र सांगितली नाही. विशेष म्हणजे Redmi 12C आधीच चीनमध्ये लाँच झाला आहे. तर Redmi Note 12 सीरिजमध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ 5G हे स्मार्टफोन आधीच भारतात आले आहेत. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती

Redmi 12C ची संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी 12सी बद्दल सांगण्यात आलं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल. तसेच बेस मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाईल तसेच मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे 170 यूरो आणि 200 यूरो असेल. ही किंमत भारतीय करंसीनुसार 15,000 रुपये आणि 17,500 रुपयांच्या आसपास आहे. Redmi 12C ग्लोबल मार्केटमध्ये Ocean Blue, Mint Green आणि Graphite Gray कलरमध्ये लाँच होऊ शकतो.

रेडमी 12सी स्मार्टफोन चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जी सेकंडरी एआय लेन्स सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे

Redmi Note 12 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन

समोर आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच केला जाईल. नाव समोर आले नसले तरी चर्चा आहे की हा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट मीयुआय 14 दिला जाईल. तसेच लीकमध्ये फोनचा 4जीबी रॅम रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या डिटेलनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जोडीला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 4G मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. हे देखील वाचा: Moto G73 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; जाणून घ्या माहिती

Redmi Note 12 4G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन आयपी53 रेटेड असेल, ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनेल. फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सारखे फीचर्स मिळतील. रिपोर्टनुसार हा मोबाइल फोन Onyx Gray, Ice Blue आणि Mint Green कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here