4 रियर कॅमेरा, 24एमपी सेल्फी, 8जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए9

गेल्या महिन्यात सॅमसंग ने भारतात तीन कॅमेरा वाला फोन गॅलेक्सी ए7 लॉन्च केला होता. तर आज कंपनीने जगातील पहिला चार रियर कॅमेरा वाला फोन लॉन्च करून सर्व फोन निर्मात्यांना आव्हान दिले आहे. मलेशिया मध्ये आयोजित एका इवेंट मधून कंपनी ने सॅमसंग गॅलेक्सी ए9 लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर आहेत आणि कंपनीने हा आता पर्यंतचा सर्वात बेस्ट कॅमेरा फोन असल्याचा दावा केला आहे. खास बाब म्हणजे लवकरच हा फोन भारतात पण उपलब्ध होईल. लॉन्च सोबतच सॅमसंग ने माहिती दिली आहे कि नोव्हेंबर पर्यंत गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च केला जाईल. खाली आम्ही फोनची सविस्तर माहिती दिली आहे.

कॅमेरा
सर्वात आधी याच्या कॅमेरा बद्दल बोलूया. सॅमसंग गॅलेक्सी 9 मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर आहेत. यातील पहिला सेंसर 24-मेगापिक्स्लचा आहे जो एफ/1.7 अपर्चर सह देण्यात आला आहे. यात ओआईएस अार्थात आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट आहे. तसेच दुसरा सेंसर एफ/2.2 अपर्चर सह 5—मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसर आहे. हा सेंसर लाइव फोकस साठी पण उपयुक्त आहे. फोनचा तिसरा रियर सेंसर एफ/2.4 अपर्चर वाला आहे जो 8-मेगापिक्सल सह येतो. हा सेंसर वाइड एंगलला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे हा 120 डिग्री पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. तसेच चौथा सेंसर 10-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.4 अपर्चर सह देण्यात आला आहे. कंपनी ने हा खासकरून झूम साठी सादर केला आहे. या फोन मध्ये 2एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. हि टेलीफोटो लेंस आहे. आता पर्यंत असे कॅमेरा इंटीग्रेशन असलेला कोणताही फोन आलेला नाही. कॅमेरा सोबत तुम्हाला लाइव इमेज आणि स्लोमोशन सारखे आॅप्शन मिळतील.

सेल्फी च्या बाबतीती पण हा फोन मागे नाही. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 24-मेगापिक्सलचा कॅमेरा वापरण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. फ्रंट कॅमेरा मध्ये पण बोके इफेक्ट आणि आॅटोफोकस सारखे फीचर्स आहेत.

डिजाइन
सध्या सॅमसंग आपल्या स्मार्टफोन मध्ये ग्लास बॉडी चा वापर करत आहे आणि या फोन मध्ये तुम्हला तेच दिसेल. फोनच्या बॅक पॅनल वर 3डी कर्व्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे जी खूप प्रीमियम वाटते. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि पिंक सहित तीन रांगांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्प्ले

फोनचा डिस्प्ले पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 6.3-इंचाची 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाली सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह उपलब्ध आहे. नॉच च्य ट्रेंड पासून कंपनी लांबच आहे. तर स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती अजून समोर आली नाही.

प्रोसेसर
सॅमसंग गॅलेक्सी ए9 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे आणि फोन मध्ये (4×2.2 गीगाहट्र्ज कोरयो 260 आणि 4×1.8गीगाहट्र्ज कोरयो 260) 14 नॅनोमीटर वाला ऑक्टकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी एड्रीनो 512 जीपीयू आहे.

मेमरी

गॅलेक्सी ए9 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम मेमरी सह सादर करण्यात आला आहे. हा सॅमसंगचा दुसरा फोन आहे ज्यात 8जीबी रॅम मेमरी आहे. याआधी फक्त गॅलेक्सी नोट 9 मध्ये असे पहिले होते. पण इथे दोन्ही मॉडेल सोबत 128जीबी मेमरी मिळेल. यात एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

सॉफ्टवेयर
हा फोन एंडरॅयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर उपलब्ध होऊ शकतो. ज्यावर तुम्हला हो एक्सपीरियंस 8.5 यूआई ची लेयरिंग मिळेल. गॅलेक्सी नोट आणि एस सीरीज च्या फोन प्रमाणे यात पण आॅलवेज आॅन डिस्प्ले आहे.

बॅटरी आणि कने​क्टिविटी

सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या सोबत क्विक चार्ज 2.0 चा सपोर्ट आहे जो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये ​फेस रिकॉग्निशन सपोर्ट सोबतच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये यूएसबी टाइप सी, वाइफाई, जीपीएस आणि ब्लूटूथ 5.0 पण आहेत. तसेच यात एनएफसी आणि सॅमसंग पे सपोर्ट पण आहे.

किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए9 ची किंमत पाहता हा 512 डॉलर मध्ये उपलब्ध होईल जे भारतीय करन्सी नुसार 43,000 रुपये होतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here