Tata Play ने Amazon Prime सह भागेदारी करत स्पेशल ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत Tata Play DTH आणि Tata Play Binge युजर्सना Amazon Prime बेनेफिट्स मोफत मिळतील. या बेनेफिट्ससह युजर्सना शॉपिंग आणि OTT चे फायदे मिळतील. यात अॅमेझॉन सेल दरम्यान युजर्सना प्राईम मेंबर्सवर सेलचा अॅक्सेस दिला जाईल. याव्यतिरिक्त, या प्लॅन अंतर्गत अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया याबाबतची सर्व माहिती.
कंपनीने Tata Play DTH पॅकमध्ये आता Amazon Prime Lite सब्सक्रिप्शन सामील झाले आहे. याची प्रारंभिक किंमत 199 रुपये प्रति महिना आहे. फायद्याबद्दल बोलायचे झाले तर, या पॅकमध्ये Tata Play पॅकमध्ये युजर्सना स्टँडर्ड टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटीचा समावेश आहे.
टाटा प्ले बिंज फायदे
कंपनीने Tata Play Binge सह Prime Lite चे फायदे पण सामिल केले आहेत. या अपग्रेडनंतर आता युजर्सना पॅकमध्ये Amazon Prime Video चा अॅक्सेस मिळेल. या सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सना 2 स्क्रीनवर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ कंटेंट पाहू शकता. यात टीव्ही आणि मोबाईल दोन्हीचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, Amazon Prime फायद्याअंतर्गत युजर्सना सेम डे डिलिव्हरी दिली जाईल. तसेच अॅमेझॉन सेल दरम्यान प्राईम मेंबर असल्याने सेलचा आधीच अॅक्सेस मिळेल. कंपनीने यामध्ये 2 पॅक लाँच केले आहेत. 199 रुपये प्रति महिना असणाऱ्या पॅकमध्ये 6 ओटीटी अॅप्स सामिल करण्यात आले आहेत, तसेच, 349 रुपयांच्या पॅकमध्ये 33 ओटीटी अॅप्सचा समावेश आहे.
Tata Play DTH
Tata Play DTH च्या 199 रुपये प्रति महिना पॅकमध्ये पण युजर्सना Amazon Prime Video चा अॅक्सेस मिळेल, ज्यात युजर्स 2 स्क्रीनवर कंटेंट स्ट्रीम करतील. यात टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनचा समावेश आहे. यात Same Day डिलिव्हरी दिली जाईल.














