OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट

Highlights

 • OnePlus 12 पहिला हा फोन होम मार्केट चीनमध्ये एंट्री घेणार आहे.
 • हा फोन काही दिवसांमध्ये भारतात येऊ शकतो.
 • यात 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

वनप्लस त्यांच्या नंबर सीरीजमध्ये नवीन फोन OnePlus 12 लाँच करणार आहे. सर्वप्रथम याला होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळेल. त्यानंतर भारतसह अन्य बाजारांमध्ये लाँच संभव आहे. परंतु कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, पहिल्या काही लीक स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स समोर आल्या आहेत. तसेच, आता मोबाइल 3सी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यात याची चार्जिंग संबंधित माहिती समोर आली आहे. चला तर मग लिस्टिंग आणि संभावित स्पेसिफिकेशन बाबत जाणून घेऊया.

OnePlus 12 3सी लिस्टिंग

 • 3सी सर्टिफिकेशन साइटच्या लिस्टिंग फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की डिवाइस PJD110 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे.
 • या प्लस्टफोर्मवर मोबाइल 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्टसह समोर आला आहे. यात चार्जिंग एडॉप्टरसाठी 11V/9.1A चा समावेश आहे.
 • तसेच लिस्टिंग माहिती व्यतिरिक्त टिपस्टरने हा पण सांगितलं आहे की या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

 • डिस्प्ले: OnePlus 12 मध्ये 6.82-इंच LTPO OLED पॅनल दिला जाऊ शकतो. ह्यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2K रिजॉल्यूशन आणि 2,600 निट्स ब्राइटनेस मिळू शकते.
 • प्रोसेसर: हा जबरदस्त फ्लॅगशिप फोन अलीकडेच लाँच केलेला सर्वात फास्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह असण्याची शक्यता आहे.
 • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये दमदार 24GB पर्यंत रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
 • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता यात OIS सह 50MP चा Sony IMX966 सेन्सर, 48MP चा Sony IMX581 अल्ट्रावाइड लेन्स आणि 64MP चा 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स ऑम्निव्हिजन OV64B सेन्सर मिळू शकतो.
 • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत वनप्लस 12 फोन 5,400mAh ची बॅटरी, 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्टसह येऊ शकतो.
 • ओएस: OnePlus 12 लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सीजन ओएस 14 वर आधारित असू शकते.
 • अन्य: स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5Gला सपोर्ट सारखे फिचर्स असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here