Motorola Razr 50 Ultra पुढील महिन्यात होऊ शकतो लाँच, जाणून घ्या कसे मिळू शकतात स्पेसिफिकेशन

मोटोरोलाची फ्लिप स्मार्टफोन सीरिज रेजर 40 चा अपग्रेड 50 येणार असल्याची बातमी काही दिवसांपासून समोर येत आहे. यात येत्या Motorola Razr 50 Ultra ला सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. तसेच, आता नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की अल्ट्रा मॉडेलला पुढील महिन्यात एंट्री दिली जाऊ शकते. त्याचबरोबर स्पेसिफिकेशनची माहिती पण शेअर करण्यात आली आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

Motorola Razr 50 Ultra लाँच टाईमलाईन आणि किंमत (लीक)

  • Motorola Razr 50 Ultra बद्दल नवीन लीक टिपस्टर ऑनलीक्सच्या माध्यमातून स्मार्टप्रिक्स साईटने शेअर केली आहे.
  • रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की अगामी रेजर 50 अल्ट्रा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये लाँच होऊ शकतो.
  • किंमत पाहता मोटोरोला रेजर 50 अल्ट्राला यूएस मध्ये रेजर+ 2024 च्या रूपामध्ये लाँच केले जाईल आणि याची किंमत 999 डॉलर असू शकते. तसेच, भारतात किंमत 89,999 रुपये होण्याची आशा आहे.

Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले: Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोनमध्ये 2640×1080 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला 6.9 इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. त्याचबरोबर कव्हर डिस्प्ले पूर्व मॉडेल प्रमाणे 3.6 इंचाचा ठेवला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: मोटोरोला रेजर 50 अल्ट्रामध्ये परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 प्रोसेसर लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: मोटोरोलाच्या या फ्लिप फोनमध्ये कथितरित्या 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: बोलले जात आहे की मोटो रेजर 50 अल्ट्रा मध्ये ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP 2x टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी यात 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: आतापर्यंत आलेल्या लीकनुसार नवीन फ्लिप मोटो रेजर 50 अल्ट्रा 4,000mAh ची बॅटरी असू शकते. फोनमध्ये यूएसबी टाईप-सी चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टची सुविधा दिली जाऊ शकते.
  • ओएस: मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा अँड्रॉईड 14 आधारित हेलोयुआय सह लाँच केला जाऊ शकतो.
  • इतर: हा कथितरित्या मोटोरोलाचा पहिला क्लॅमशेल फोल्डेबल बनू शकतो, ज्यात ज्यात इंट्रीगेटेड एआय फोटो/व्हिडिओ घेणे आणि एआय एडटिंग टूल मिळू शकतात. डिव्हाईसमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकची सुविधा पण दिली जाऊ शकते. तसेच हा eSIM कोला सपोर्ट करू शकतो, आणि IPX8 वॉटर-रेसिस्टेंट रेटिंगसह येऊ शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here