iQOO Neo 9s Pro 20 मे ला होईल लाँच, जाणून घ्या या फोनमध्ये कसे मिळतील स्पेसिफिकेशन

12GB RAM आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद असलेला iQOO Neo 9 Pro भारतात 33,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या सीरिजचा अजून एक नवीन मोबाईल आता आयकू द्वारे चीनमध्ये सादर केला जाणार आहे. कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे की येत्या 20 मे ला iQOO Neo 9s Pro चीनमध्ये लाँच करतील. या मोबाईलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

iQOO Neo 9s Pro लाँचची माहिती

आयकूने घोषणा केली आहे की ते येत्या 20 मे ला चीनमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत आणि यावेळी आयकू नियो 9 एस प्रो टेक मंचावर सादर केला जाईल. हा लाँच कार्यक्रम चीनमध्ये सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ज्याला भारतात सायंकाळी 5 वाजता लाईव्ह पाहिले जाऊ शकते. आशा करू शकता की iQOO Neo 9s Pro येत्या दिवसांमध्ये भारतीय बाजारात पण सादर केला जाऊ शकतो.

लीक झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे की आयकू नियो 9 एस प्रो पंच-होल स्टाईल स्क्रीनवर लाँच होईल. हा राऊंड ऐज फ्लॅट डिस्प्ले असेल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. आयकू नियो 9 एस प्रो च्या खालच्या फ्रेमवर स्पिकर सह यूएसबी टाईप-सी पोर्ट पण मिळेल.

iQOO Neo 9s Pro चे स्पेसिफिकेशन (लीक)

प्रोसेसर : आयकू नियो 9 एस प्रो बद्दल सांगण्यात आले आहे की हा मोबाईल MediaTek Dimensity 9300+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केला जाईल. ही 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली चिपसेट आहे जो 3.4Ghz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

इनबिल्ट गेमिंग चिप : iQOO Neo 9s Pro मध्ये पावरफुल प्रोसेसर सोबतच Supercomputing Chip Q1 पण दिली जाईल. ही चिप खास करून मोबाईल गेमिंगसाठी बनविली गेली आहे जो फोनमध्ये गेमला फास्ट, स्मूद तसेच लॅग फ्री बनविते.

मेमरी : लीकनुसार आयकू नियो 9 एस प्रो 16 जीबी रॅमवर लाँच केला जाईल. त्याचबरोबर फोनमध्ये 16 जीबी वचुर्अल रॅम पण दिली जाईल जी फिजिकल रॅमसह मिळून याला 32GB RAM (16GB+16GB) ची ताकद प्रदान करेल.

स्टोरेज : iQOO Neo 9s Pro स्मार्टफोनला 1TB Storage च्या क्षमतेसह बाजारात आणले आहे. हा फोन सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये मिळेल. तसेच मोबाईलचा बेस व्हेरिएंट 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो.

स्क्रीन : आयकू नियो 9 एस प्रो स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाची मोठी स्क्रीन पाहायला मिळू शकते. लीकनुसार हा 8 टी एलटीपीओ OLED पॅनल असणारा डिस्प्ले असेल, जो 144Hz रिफ्रेश रेटवर काम करेल.

बॅटरी : लीकनुसार iQOO Neo 9s Pro ला 5160mAh बॅटरीसह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here