Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

Electric Vehicle जेव्हा भारतात नवीन होते तेव्हा हे चालणार नाहीत, असा दावा लोक करत होते. काहींच्या मते यांचा पिक-अप चांगला नाही तर काहींना या वाहनांवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु आता लोकांना इलेक्ट्रिक व्हेईकल्स आवडू लागेल आहेत. परंतु एक समस्या आहे की सध्या Electric Car, Electric Scooter आणि Electric Bike च्या किंमती भारतात थोड्या जास्त आहेत आणि त्यामुळे सामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रिक व्हेईकल्सचं मार्केट बदलणार आहे. विजेवर चालणाऱ्या या वाहनांची किंमत कमी होईल आणि याला Battery Swapping Policy कारणीभूत असेल.

Battery Swapping Policy

नावावरून समजलं असेल की बॅटरी स्वॅपिंग म्हणजे बॅटरीची अदलाबदल. समजा तुमच्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी डाउन झाली आहे, आता ही चार्ज करण्यासाठी 5-6 तास लागू शकतात. परंतु तुमच्याकडे तितका वेळ नाही. अशावेळी तुम्ही चार्जिंग स्टेशनवर जाल तुमची डिस्चार्ज बॅटरी तिथे ठेवाल आणि त्याबदल्यात दुसरी फुल्ली चार्ज बॅटरी घेऊन याल. हेच आहे बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी मध्ये. म्हणजे युजरला बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही आता डिस्चार्ज बॅटरी देऊन त्याबदल्यात फुल्ली चार्ज्ड बॅटरी घेता येईल. हे तुमच्या गॅस सिलेंडर सारखं आहे जो संपला की तुम्ही रिकामा सिलेंडर देऊन भरलेला घेता. हे देखील वाचा: How to port SIM: नंबर तोच ठेवून मोफत मिळवा 5G सिम, जाणून घ्या सिम पोर्ट करण्याची सोपी पद्धत

वरील माहिती वाचून समजलं असेल की बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी म्हणजे काय. परंतु गॅस सिलेंडर असलेलं उदाहरण वाचून असं समजू नका की प्रत्येक चार्ज बॅटरीसाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील, असं होणार नाही. डिस्चार्ज बॅटरी देऊन चार्ज बॅटरी घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार नाही. इथे जास्तीत जास्त तेवढेच पैसे घेतले जातील जितकं चार्जिंग दरम्यान पावर कंजप्शन होतं. आणि येत्या काळात वेगवेगळे चार्जिंग स्टेशन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सब्सक्रिप्शन पॅक देखील विकू शकतात.

युजरला होईल फायदा

Battery Swapping Policy मुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या किंमती कमी होतील तर बॅटरी स्वॅपिंगची ही प्रक्रिया ग्राहकांना उपयुक्त ठरेल. प्रवासात युजर एक एक्स्ट्रा बॅटरी फुल चार्ज करून वाहनात ठेऊ शकतात ज्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होण्याची भीती आणि तासंतास चार्जिंग स्टेशनवर उभं राहण्याचं झंझट संपेल. जे काम मोबाइल फोनसाठी पावरबँक करते तोच बॅटरी स्वॅपिंगमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल. चार्जिंग कनेक्शन उपलब्ध नसल्यास पावर डाउन होण्याची भीती कमी होईल आणि बॅटरी डिस्चार्ज होण्याचं टेंशन राहणार नाही.

कोरियामध्ये कशी होते बॅटरी स्वॅपिंग पाहा :-

ATM सारखे असतील बॅटरी स्वॅपिंग सेंटर

पाश्चात्य देश अशाप्रकारच्या पॉलिसीवर आधीपासून काम करत आहेत. जवळपास प्रत्येक 5 किलोमीटरवर एक बॅटरी स्वॅपिंग सेंटर मिळू शकतं. अशा सेंटर्ससाठी मोठ्या सेटअपची गरज नाही. बॅटरी स्वॅपिंग मशीन एखाद्या एटीएम मशीन प्रमाणे असेल जिथे 8 ते 10 चार्ज्ड बॅटरीज ठेवल्या जातील. कोणताही युजर टोकन वैगरे घेऊन त्या मशीनमधून चार्ज्ड बॅटरी काढू शकेल आणि खाली झालेल्या स्लॉटमध्ये आपली डिस्चार्ज बॅटरी ठेऊ शकेल. तसेच डिस्चार्ज बॅटरी मशीनमध्ये जाताच चार्ज होण्यास सुरु होईल. हे देखील वाचा: टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु

बॅटरी स्वॅपिंगचा फायदा

बॅटरी स्वॅपिंगसाठी Electric Vehicle मधील बॅटरी सहज काढता येणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे दोन बॅटरीज असणं देखील आवश्यक आहे जेणेकरून एक फुल चार्ज्ड बॅटरी वाहनात राहील आणि दूसरी डिस्चार्ज बॅटरी बाहेर चार्जिंगवर लावता येईल. देशात बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू होताच बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा वेगळा पार्ट बनेल. बॅटरी वेगळी झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन बनवणारे ब्रँड्स फक्त व्हेईकलचं प्रोडक्शन करतील त्यामुळे वाहनाच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये बॅटरीची कॉस्ट नसेल. याचा अर्थ असा की इलेक्ट्रिक व्हेईकलच्या किंमती कमी होतील. यासाठी आम्ही स्मार्टफोन ब्रँड्सचं उदाहरण घेऊ शकतो जे आपले मोबाइल फोन्स वेगळे बनवतात तसेच ईयरफोन व इअरबड्स फोन बॉक्समध्ये न देता वेगळे विकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here