Vivo Y200 Pro 5G चे भारतातील लाँच झाले कंफर्म, ब्रँडने शेअर केला टिझर व्हिडिओ

Update: विवोने Y200 Pro 5G फोनच्या लाँचच्या तारखेची घोषणा केली आहे, हा डिव्हाईस 21 मे ला भारतीय बाजारात सादर केला जाईल. पुढे तुम्ही कमिंग सून टिझर बाबत बातमी पाहू शकता.

विवोने भारतात आपल्या वाय-सीरिजचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यात नवीन Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोन सादर केला जाईल. परंतु अजून लाँचची तारीख समोर आली नाही, मात्र व्हिडिओ टिझरच्या माध्यमातून डिव्हाईसच्या डिझाईनची पुष्टी झाली आहे. तसेच मागच्या काही दिवसांपूर्वी मोबाईलचे स्पेसिफिकेशन पण लीक झाले होते. चला, पुढे नवीन टिझर आणि इतर विशेषता सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y200 Pro 5G भारतातील लाँच कंफर्म

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कंपनीने नवीन मोबाईल Vivo Y200 Pro 5G चा टिझर व्हिडिओ जारी केला आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की डिव्हाईसला कमिंग सून सह दाखविले आहे.
  • ब्रँडने हे पण कंफर्म केले आहे की Vivo Y200 Pro 5G 3D कर्व डिस्प्लेसह खूप पातळ असेल.
  • कलर ऑप्शन पाहता स्मार्टफोन ग्रीन कलरमध्ये समोर आला आहे. याच्या बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश पाहायला मिळते.
  • आशा आहे की फोनला या महिन्या पुढच्या आठवड्यात एंट्री मिळू शकते.

Vivo Y200 Pro 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • 6.78 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट
  • 8 जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेज
  • 64MP रिअर कॅमेरा
  • 16MP फ्रंट कॅमेरा
  • 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले: मागच्या काही दिवसांपासून समोर आलेल्या लीकनुसार Vivo Y200 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंचाचा 3 डी कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 निट्स ब्राईटनेस मिळू शकते.

प्रोसेसर: विवो वाय 200 प्रो 5 जी मोबाईलमध्ये ब्रँड Qualcomm Snapdragon 695 ऑक्टाकोर प्रोसेसर लावू शकतो. या कमी बजेट असणाऱ्या फोनमध्ये खूप उपयोग होणारी चिपसेट आहे जी 2.2Ghz क्लॉक स्पीड प्रदान करते.

स्टोरेज: फोनमध्ये 8GB रॅम, 8 जीबी एक्सटेंटेड रॅमसह 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता Vivo Y200 Pro 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह मिळेल. ज्यात OIS टेक्नॉलॉजीसह 64MP चा प्रायमरी लेन्स आणि 2MP चा Bokeh लेन्स असू शकते. तसेच, 16MP चा सेल्फी कॅमेरा लावला जाऊ शकतो.

बॅटरी: Vivo Y200 Pro 5G डिव्हाईस मोठ्या बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरीसह एंट्री घेऊ शकतो. याला चार्ज करण्यासाठी 44 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here