Honor Play 4 Pro लॉन्चच्या आधी झाला ई-कॉमर्स साइट वर लिस्ट, येईल 40 MP कॅमेरा आणि डुअल पंच होल सह

गेल्या महिन्यात Honor ने आपल्या घरेलू मार्केट चीन मध्ये प्ले सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स सादर केले होते. हे दोन्ही फोन हॉनर Play 4T आणि Play 4T Pro नावाने सादर केले गेले होते. तसेच आता कंपनी पुन्हा एकदा या सीरीजच्या मध्ये अजून एक नवीन फोन सादर करण्याची तयारी करत आहे. हा डिवाइस हॉनर प्ले 4 प्रो नावाने लॉन्च केला जाईल. डिवाइस लॉन्चच्या आधीच चीन की ई-कॉमर्स साइट JD.com वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये Honor Play4 Pro स्मार्टफोनचे फोटो दिसत आहेत, ज्यामुळे हँडसेटची डिजाइन स्पष्टपणे दिसत आहे. तसेच काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

JD.com लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटोजच्या आधारावर फोनच्या डिजाइनची माहिती देण्याआधी सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी Play 4 Pro Wi-Fi Alliance आणि 3C सर्टिफिकेशन साइट वर OXP-AN00 मॉडेल नंबर सह दिसला होता.

डिजाइन

लिस्टिंग नुसार Honor Play4 Pro मध्ये देण्यात आलेल्या डिस्प्ले मध्ये टॉप लेफ्ट कॉर्नर वर पिल-शेप कटआउट असेल, ज्यात डुअल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाईल. तसेच डिवाइस मध्ये थोडी जाड चिन आणि डिस्प्ले वर बारीक बेजल्स असतील. Play4 Pro खूप हाई-स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो देईल.

Honor Play4 Pro च्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटण असेल, ज्याच्याखाली फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. या सेंसरचा वापर पावर बटण म्हणून केला जाईल. तसेच वरच्या बाजूला टॉप लेफ्ट कॉर्नर वर डुअल लेंस आणि एलईडी फ्लॅश सह कॅमेरा सेटअप असेल. या कॅमेऱ्याच्या खाली 40 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर असे लिहिण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन्स

ई-कॉमर्स साइटच्या लिस्टिंग व्यतिरिक्त एका टिपस्टरने माहिती दिली होती कि Honor Play4 Pro एक 5G-रेडी डिवाइस असेल. डिवाइस मध्ये 40-मेगापिक्सलची लेंस असेल जी सोनीची फ्लॅगशिप सेंसर IMX600Y RYYB असेल. तसेच फोन मध्ये Kirin 820 5G दिला जाईल. आशा आहे कि फोन लवकरच सादर केला जाऊ शकतो.

Honor Play4 Pro च्या 3C लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मध्ये 40W चार्जिंग (10V x 4A) सपोर्ट आणि 5G कनेक्टिविटी असेल. स्मार्टफोनच्या Wi-Fi Alliance लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि फोन मध्ये dual-band वाय-फाई a/b/g/n/ac असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here